पुण्यात उद्यापासून प्री-ओन्ड कार फेस्टिव्हल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

‘सकाळ’ व ‘मारुती ट्रू व्हॅल्यू’तर्फे ‘ऑटो एक्‍स्पो २०१७’ चे आयोजन

पुणे - स्वप्नातील कार घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘मारुती ट्रू व्हॅल्यू’ने दोन दिवसांच्या ‘प्री-ओन्ड कार फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. कर्वेनगर परिसरातील पंडित फार्म येथे शनिवारी (ता. २७) आणि रविवारी (ता. २८) होणाऱ्या या एक्‍स्पोत प्री-ओन्ड स्मॉल कार्स, सेडान कार, हॅच बॅक कार अशा कितीतरी गाड्यांच्या किमती आणि ईएमआयसंबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळणार आहेत. एक्‍स्पो सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेत सर्वांसाठी खुला आहे.

नवीन गाडी लगेच घेणे ज्यांना शक्‍य नसते, त्यांच्यासाठी प्री-ओन्ड कारचा पर्याय योग्य ठरतो; मात्र ठिकठिकाणच्या शोरूमला जाऊन गरज आणि बजेटप्रमाणे विविध गाड्यांची माहिती घ्यायची, तुलना करायची, यापेक्षा ही सर्व माहिती एकाच छताखाली मिळते तेव्हा कार घेण्याचे स्वप्न लवकर वास्तवात उतरते. या एक्‍स्पोत मारुतीच्या विविध प्री-ओन्ड कारच्या फिचर्सची माहिती मिळणार असून, या गाड्यांची मोठी शृंखलाही पाहायला मिळणार आहे. चौगुले इंडस्ट्रीज, साई सर्व्हिस, माय कार, द कोठारी व्हील्स, महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह, सेहगल ऑटो, ऐस कुदळे कार्स, वंडर कार्स, मोटो ड्राइव्ह, एक्‍सेल ऑटोविस्ता या ‘मारुती’च्या डीलर्सचा एक्‍स्पोत सहभाग आहे. मारुती ट्रू व्हॅल्यूच्या प्री-ओन्ड कारची माहितीही उपलब्ध होणार आहे. 

ऑटो एक्‍स्पो २०१७
पंडित फार्म, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर
शनिवार (ता. २७) आणि रविवार (ता. २८) 
वेळ : सकाळी ११ ते रात्री ७
प्रवेश व वाहनतळाची सुविधा मोफत

Web Title: pune news auto expo 2017