‘सर्टिफाइड प्रीओन्ड कार’ ऑटो एक्‍स्पो उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे - स्वतःच्या मालकीची कार असावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असले तरी पुष्कळदा बजेट आणि कारची किंमत यांचा मेळ बसत नाही. अशावेळी प्रीओन्ड कार हा उत्तम पर्याय ठरतो. त्यातही ती कार सर्टिफाइड केलेली असली, तर मग प्रीओण्ड कार घेण्यामागची काळजी आणि चिंता मिटतात. निर्धास्तपणे मग प्रीओण्ड कार खरेदी करता येते. ‘सकाळ’ व ‘मारुती ट्रु व्हॅल्यू’ने आपल्या बजेटनुसार आपल्या पसंतीची उत्तम कार देणारे सर्टिफाइड प्रीओन्ड कार्सचे दोन दिवसांचे प्रदर्शन येत्या शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) राजाराम पूल परिसरातील महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित केले आहे. 

प्रीओन्ड कार घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. शिवाय ती खरेच चांगली असेल का, तिच्यासाठी कर्ज मिळेल का, अशा प्रश्‍नांबरोबर गाड्यांच्या वेगवेगळ्या फिचर्समुळे कोणती कार घ्यावी या बद्दलही संभ्रम असतो. प्रीओन्ड कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या मनातील या सर्व प्रश्‍नांना दोन दिवसांच्या या ‘सर्टिफाइड प्रीओन्ड कार एक्‍स्पो’मध्ये उत्तरे 
मिळणार आहेत. 

काय - ‘सकाळ’ प्रीओन्ड ऑटो एक्‍स्पो 
कुठे - महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल परिसर, कर्वेनगर
कधी - शनिवार (ता. २०) आणि रविवार (ता. २१) जानेवारी
केव्हा - सकाळी ११ ते संध्याकाळी ७
प्रवेश व पार्किंग मोफत 

Web Title: pune news auto expo