ज्ञानसाधना निरंतर हवी - अविनाश धर्माधिकारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

पुणे - ‘विविध स्पर्धा परीक्षांतील यश हा एक टप्पा असतो. तिथे न थांबता ज्ञानसाधना निरंतर हवी’’ असे, प्रतिपादन चाणक्‍य मंडल परिवारचे संचालक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. यूपीएससी परीक्षेत चाणक्‍य मंडलच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे - ‘विविध स्पर्धा परीक्षांतील यश हा एक टप्पा असतो. तिथे न थांबता ज्ञानसाधना निरंतर हवी’’ असे, प्रतिपादन चाणक्‍य मंडल परिवारचे संचालक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. यूपीएससी परीक्षेत चाणक्‍य मंडलच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन कार्यक्रमात ते बोलत होते.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही ’चाणक्‍य’ चे अनेक विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. ‘‘स्वतःला ओळखून करिअरचे क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी प्रयत्न करा,’’ असेही धर्माधिकारी म्हणाले. यावेळी ’चाणक्‍य’ चे विद्यार्थी आणि सध्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये असलेले शशांक देवगडकर हेही उपस्थित होते. देवगडकर सध्या पुण्यात डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. 

देशात अकरावी आणि राज्यात पहिली आलेली विश्वांजली गायकवाड हिने अभ्यास मार्क्‍ससाठी नाही तर आवड म्हणून करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. सरांमधील मित्रांमुळे अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते असे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलेला विद्यार्थी सुरज जाधव म्हणाला.

‘‘अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी ’चाणक्‍य’मध्ये करता येतात; इथे आल्यामुळे आपल्याला अवांतर वाचन खूप करता आले आणि त्याचा फायदा परीक्षेच्या तयारीत झाला’’ असेही सुरज म्हणाला. ’’चाणक्‍य मंडलमध्ये काम करताना आलेल्या अनुभवांचा परीक्षेच्या तयारीसाठी फायदा झाला आणि आयुष्यातील लहानसहान गोष्टींतून प्रेरणा घ्यायला शिकलो यामुळे आपल्याला या परीक्षेत यश मिळवता आले’’, असे देशात ४२३ वा आलेला महेश चौधरी म्हणाला. ’रोज योग आणि ध्यान केल्याचा फायदा होतो.

कार्यकर्ता अधिकारी वृत्तीने देशसेवा करण्याचे आश्वासन मी देतो. तसेच यशाची चव चाखण्याआधी आलेल्या अनेक अपयशांमुळे खचून न जाता जिद्दीने अभ्यास करा’, असा सल्ला त्याने विद्यार्थ्यांना दिला.

Web Title: pune news avinash dharmadhikari talking

टॅग्स