अडीच वर्षांच्या अवीरची नकाशावरची 'जगभरारी'

वैशाली भुते
मंगळवार, 27 जून 2017

पिंपरी: आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात जन्मलेली मुले संगणकाप्रमाणे "स्मार्ट' असल्याचे बोलले जाते. त्याचाच प्रत्यय अवघ्या अडीच वर्षांच्या अवीर जाधवकडे पाहिल्यावर येतो. अचाट बुद्धिमत्ता लाभलेला हा चिमुकला अवघ्या काही मिनिटांत जगाच्या नकाशावरील सर्व 203 देश दाखवितो. केवळ दाखवतच नाही, तर या देशांची नावेही त्याला तोंडपाठ आहेत. अवीर एवढ्याच वयाच्या न्यूयॉर्कमधील मुलाच्या नावावर पावणेपाच मिनिटांत नकाशावरील देश दाखविण्याचा विश्‍वविक्रम आहे. अवीर सध्या त्यासाठी पाच ते सहा मिनिटे घेत असला, तरी लवकरच हा विश्‍वविक्रम तोडून नवा प्रस्थापित करण्याच्या तो तयारीत आहे.

आठवीनंतर जगाच्या नकाशाचा अंतर्भाव शालेय अभ्यासक्रमात होतो. अवीरने मात्र त्याच्या एक पाऊल पुढे जात नकाशाचा कानाकोपरा अभ्यासला आहे. नकाशावरील सर्व देश तो विनाविलंब चुटकीसरशी सांगतो. नकाशावर झरझर फिरणारी चिमुकली बोटे पाहून भूगोलाचे शिक्षकही थक्क होतात. अगदी सुईच्या टोकाएवढे दिसणारे "लिस्टेंस्टाईन', "लक्‍झेंबर्ग', "अँडोरा' असे देश व "आयलंड' तो सहजपणे दर्शवितो. तसेच आशिया, युरोप, आफ्रिका असे खंडही तो ओळखतो. देश, त्यांचे शेजारी तसेच केवळ नकाशावरच नाही, तर अन्य कोणत्याही ठिकाणी तो हे देश ओळखतो. त्याबाबत सहा वर्षे वयोगटासाठी असलेली "पझल'ही तो अल्पावधीतच सोडवतो. त्याअंतर्गत देशाचा नकाशा त्या देशाचा राष्ट्रीय प्राणी, ध्वज, राजधानी आणि भाषा एकत्र जोडतो. या "पझल'शी खेळत असतानाच त्याची आई रिंका जाधव यांना त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक दिसली. त्यातून त्यांनी अवीरसाठी जगाचा नकाशा खरेदी केला. केवळ 15 दिवसांत त्याने हा नकाशा तोंडपाठ केला.'

याबाबत जाधव म्हणाल्या, "त्याने एक ते दीड वर्षाच्या वयातच इंग्रजी अक्षरे, रंग, आकडे, सर्व प्रकारचे पक्षी, प्राणी, आकार या विषयात हुकूमत मिळवली. तेथेच त्याच्या बुद्धिमत्तेचा अंदाज आल्याने आम्ही तो दोन वर्षांचा असताना मोठ्या वयोगटासाठी असलेल्या पझल घेऊन आलो. हे पझल तो पटापट सोडवूही लागला. एकदा मी जगाचा नकाशा पाहत असताना तो तेथे आला. त्यातील काही देशांची नावे सांगू लागला. ते पाहून मी अवाक झाले. त्यानंतर त्याला अन्य देशांचीही दोन-तीन वेळा ओळख करून दिली. तेही त्याने पक्के लक्षात ठेवले. आता हेच देश आणखी कमी कालावधीत कसा सांगू शकेल, यासाठी माझा प्रयत्न आहे.''

Web Title: pune news avir jadhav show country in world map