विद्येच्या माहेरघराचा बंगाली तरुणांना ओढा

Pune-University
Pune-University

पुणे - अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय शिक्षण घ्यायचे. स्वतःच्या पायावर उभे राहायचे. पुण्यातच नोकरी मिळाली तर येथेच स्थायिक व्हायचे. या उद्देशाने अनेक बंगाली भाषक तरुण-तरुणी विद्येच्या माहेरघराला पसंती दर्शवित आहेत. विशेषत्वाने पुण्यातले आयटी क्षेत्राचे आकर्षण, येथेच नोकरी मिळाल्यावर आंतरजातीय विवाह करून स्थायिक होण्यास विशेष रुची दर्शवित आहेत.  

देश-विदेशातून ‘एज्युकेशन हब’ असलेल्या पुण्यात शिक्षणाकरिता तरुण-तरुणी येतात. मात्र, येथील राहणीमान, हवामानसुद्धा पश्‍चिम बंगालच्या तुलनेत उत्तम आहे. या कारणास्तवही तेथील तरुण-तरुणी पुण्याकडे वळत आहेत. प्रामुख्याने आयटी क्षेत्र जसजसे विकसित होऊ लागले. तसतसे पश्‍चिम बंगालहून पुण्याकडे येणाऱ्या तरुणांचाही ओढा वाढू लागल्याचे बंगाली नागरिक सांगतात.  

पिंपरी-चिंचवड, देहू रोड, हडपसर, कोथरूड, बाणेर, बालेवाडी अशा विविध उपनगरांत बंगाली नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. दरवर्षी बंगाली नववर्ष दिन असो की, नवरात्रोत्सव असो. कार्यक्रमानिमित्त एकत्रित येऊन ते उत्सव साजरा करतात. 

खडकी येथील पुणे काली बाडी मंदिराचे विश्‍वस्त अनुप दत्ता म्हणाले, ‘‘कोलकत्यात आजही पुण्याचे आकर्षण आहे. कारण पुण्यातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा उत्तम आहे. अनेक प्रकारचे शिक्षण येथे उपलब्ध आहे. आवडीचे शिक्षण सहजगत्या तरुणांना येथे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे येथे स्थायिक झालेल्या बंगाली नागरिकांना पश्‍चिम बंगालमधील त्यांचे नातेवाईक, मित्र परिवाराकडून त्यांच्या मुला-मुलींकरिता शिक्षणाच्या संधींबद्दल वारंवार विचारणा होत असते. येथील नागरिकही त्यांना सहकार्य करतात. येणारे तरुण-तरुणी पेइंग गेस्ट म्हणून येथे राहतात. 

आता तर महाराष्ट्रीय तरुण-तरुणींशीही तेथील तरुण-तरुणी विवाहबद्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे शिक्षणाकरिता आल्यावर येथेच स्थायिक होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com