दोनशेच्या नोटांची बॅंकांनाही प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिवाळीत बॅंकांना पुरविलेल्या रेमीटन्समध्ये दोनशेच्या नव्या नोटा दिल्या. नागरिकांनीही लक्ष्मीपूजनाकरिता नव्या नोटा घेतल्या. मात्र, दोनशेच्या नोटांचा पुरवठा मर्यादित झाला. त्यामुळे व्यवहारातही या नोटा मर्यादित स्वरूपात असून, बॅंकादेखील येणाऱ्या रेमीटन्समध्ये दोनशेच्या नव्या नोटांच्या पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, पन्नास रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. 
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार व पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या. आता दोनशेची नवी नोटही चलनात आली आहे; परंतु पुरवठा मर्यादित असल्याने त्या एटीएमवर मिळत नाहीत, परंतु बॅंकांमध्ये मिळतात. नव्या पाचशेच्या नोटेच्या तुलनेत दोनशेची नोट आकाराने लहान आहे. ही नोट अत्यंत आकर्षक असून तिचा रंगही उठावदार आहे. नोटेच्या चारही बाजूंस सुरेख नक्षीकाम आहे. ऐतिहासिक वास्तूंचे छायाचित्रही नोटेवर पाहायला मिळते. पाकिटात सहज ठेवता येईल, अशी ही नोट आहे. त्यावर ‘स्वच्छ भारत अभियाना’संबंधी सूचनाही आहे. ‘‘टप्प्याटप्प्याने दोनशेच्या नोटा रेमीटन्सद्वारे बॅंकांकडे येतील, त्यानुसार ग्राहकांनाही उपलब्ध होऊ शकतील. सध्या तरी उपलब्ध नोटांचा ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करीत आहोत,’’ असे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आयडीबीआय बॅंकेचे पुणे विभागाचे सरव्यवस्थापक ब्रिजमोहन शर्मा म्हणाले, ‘‘सिंगापूरच्या नोटांप्रमाणे दोनशेच्या नोटेची रचना सुरेख आहे. बॅंकेच्या करन्सी चेस्टकडे दिवाळीच्या दरम्यान आलेल्या अर्थपुरवठ्यात दोनशेच्या नोटा आल्या; परंतु त्यांची संख्या मर्यादित होती. तरीही बॅंकेच्या विविध शाखांना दोनशेच्या नोटा पुरविण्यात आल्या. रिझर्व्ह बॅंकेकडून एटीएममध्ये दोनशेच्या नोटा उपलब्ध करून देण्याबाबत अद्याप काही सूचना आलेली नाही. मात्र भविष्यात एटीएमचे रिकॅलिब्रेशन करावे लागेल. पन्नास रुपयांचीही नवी नोट चलनात आली आहे.’’

Web Title: pune news bank waiting 200 rupees currency