बारामतीवर करडी नजर राहणार तब्बल 168 सीसीटीव्ही कॅमे-यांची....

मिलिंद संगई
शुक्रवार, 14 जुलै 2017

वाढत्या लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या तुलनेत पोलिस कर्मचारी संख्या अपुरी असल्याने सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची विनंती पोलिसविभागाने नगरपालिकेला केली होती. त्या नुसार नगरपालिकेने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. 

बारामती : शहराच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिस विभागाने मागणी केल्यानुसार नगरपालिकेच्या हद्दीत 168 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय बारामती नगरपालिकेने घेतला आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, गटनेते सचिन सातव यांनी या बाबत माहिती दिली. 

सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्यसभेचे खासदार डी.पी. त्रिपाठी यांच्या खासदारनिधीतून 75 लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार असून नगरपालिका आपल्या निधीतून 25 लाख रुपये खर्च करणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून बारामती नगरपालिकेला हा निधी उपलब्ध झाला आहे. 

नगरपालिकेची हद्दवाढ होऊन अ वर्ग दर्जाची नगरपालिका म्हणून बारामती नगरपालिकेला मान्यता मिळाली. या हद्दवाढीनंतर रुई, जळोची, तांदूळवाडी व बारामती ग्रामीण हा भाग नगरपालिकेत समाविष्ट झाला. हद्दवाढीनंतर नगरपालिकेचे कार्यक्षेत्र 55 स्क्वे.कि.मी. इतके व्यापक झाले. हद्दवाढीनंतर शहराती लोकसंख्याही जवळपास 1 लाख 10 हजार इतकी झालेली आहे. 

प्रकल्प अहवाल तयार
दरम्यान या कामाचा प्रकल्प अहवाल तयार केल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली. संपूर्ण शहरात पोलिसांच्या सूचनेनुसार 168 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार असून ते उच्च क्षमतेचे असतील व रात्रीच्या वेळेसही स्पष्टपणे दिसू शकेल असे ते असतील. या मध्ये वाहनांच्या नंबरप्लेट स्कॅनिंग होऊ शकतील जेणेकरुन वाहन कोणाचे हे लगेचच समजू शकणार आहे. या शिवाय ध्वनीक्षेपक यंत्रणाही बसविली जाणार आहे. या संपूर्ण कॅमेरे व ध्वनीक्षेपक यंत्रणेचे समन्वय करण्यासाठी बारामतीत दोन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत. 

■ ई सकाळवरील महत्वाच्या ताज्या बातम्या 
परभणी: दूबार पेरणीच्या संकटाने युवकाची आत्महत्या
साहेब, आम्ही दारिद्र्यातच जीवन जगावे का?
बारामती-फलटण रेल्वेमार्ग संपादनासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा
सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावर माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प
मराठवाड्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याने संपविले जीवन
गेल्या महिन्याभरात साडेतीन हजार "चाईल्ड पोर्नोग्राफी' साईट्‌स बंद
नांदेडमध्ये वाहतूक शाखेची अडीच महिण्यात दमदार कारवाई
पुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात
'एलआयसी'चे एयर इंडिया करू नका !; 'जीएसटी'ही काढा
भारतातील "फेसबुक युजर्स'ची संख्या जगातील सर्वोच्च...

Web Title: pune news baramati cctv camera surveillance