बारामती - नॅशनल मेडिकल आयोगाचा निषेध

वृत्तसंस्था
रविवार, 11 मार्च 2018

बारामती आय एम ए शाखेच्या डॉक्टरांनी यात सहभागी होण्यासाठी निषेध सायकल रॅलीचे आयोजन केले होते. सकाळी 7 वाजता शारदा प्रांगणापासून या रॅलीचा प्रारंभ झाला.  सिनेमा रोड, इंदापूर चौक, गुणवडी चौक, कारभारी चौक, मारवाड पेठ मार्गे परत भिगवण चौकात येऊन भिगवण रोड वर ह्या सायकल रॅली ची सांगता करण्यात आली

बारामती - सरकारच्या येऊ घातलेल्या नॅशनल मेडिकल आयोगाचा निषेध करण्यासाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे देशभरातून निषेध सायकल रॅली काढण्यात आल्या. 

बारामती आय एम ए शाखेच्या डॉक्टरांनी यात सहभागी होण्यासाठी निषेध सायकल रॅलीचे आयोजन केले होते. सकाळी 7 वाजता शारदा प्रांगणापासून या रॅलीचा प्रारंभ झाला.  सिनेमा रोड, इंदापूर चौक, गुणवडी चौक, कारभारी चौक, मारवाड पेठ मार्गे परत भिगवण चौकात येऊन भिगवण रोड वर ह्या सायकल रॅली ची सांगता करण्यात आली.

या वेळी विविध ठिकाणी आय एम ए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, बारामती आय एम ए चे अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे, सचिव डॉ. राहुल संत, जेष्ठ सदस्य डॉ. विक्रांत धोपाडे, डॉ. धवडे, डॉ. गोकुळ काळे यांनी या अन्यायकारक कायद्याची माहिती दिली. 
बारामती आय एम ए च्या 70 सभासदांनी , त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्रपरिवाराने यात सहभाग नोंदवला. या वेळी सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत या मसुद्याची माहिती देणारी पत्रके आयएमएच्या वतीने वाटण्यात आली.

Web Title: pune news baramati national medical commission