वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्यावतीने आंदोलन

मिलिंद संगई
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

बारामतीः तालुक्यातील 150 हून अधिक रोहित्रांचा वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (सोमवार) महावितरणच्या उर्जा भवनसमोर आंदोलन करुन याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आज उर्जा भवनचा परिसरत दणाणून गेला होता.

बारामतीः तालुक्यातील 150 हून अधिक रोहित्रांचा वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (सोमवार) महावितरणच्या उर्जा भवनसमोर आंदोलन करुन याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आज उर्जा भवनचा परिसरत दणाणून गेला होता.

या रोहित्रांचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकच खंडीत करण्यात आल्यामुळे शेतीपंप, नळपाणीपुरवठा योजना, व्यावसायिक व घरगुती वापराच्या वीज जोडण्या या मुळे बंद पडल्या आहेत. या भागातील ग्राहकांना अजून वीज बिलेच मिळालेली नसताना रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करणे अन्यायकारक असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले गेले.

महावितरणच्या या निर्णयाने शेतीचे नुकसान होते आहे, वीजच नसल्याने उसाचे बेणे पडून आहे, लागवड करणे शेतक-यांना अवघड बनले आहे, घरगुती व व्यावसायिकांनाही याचा नाहक फटका बसत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे भारनियमन, भरमसाठ येणारी वीजबिले, मनमानी पध्दतीने रोहित्रांचा वीजपुरवठा खंडीत करण्याच्या या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिलाध्यक्षा वनिता बनकर, अनिता गायकवाड, युवकाध्यक्ष राहुल शेवाळे,  तुषार कोकरे, आरती शेंडगे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अँड. राजेंद्र काटे, बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे, सुनील बनसोडे, धनवान वदक यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते, नगरसेवक या प्रसंगी उपस्थित होते. महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांनी निवेदन स्विकारले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news baramati ncp against the supply of electricity