पुलकसागरजींचे बारामतीत सर्वधर्मियांकडून उत्साहात स्वागत

पुलकसागरजींचे बारामतीत सर्वधर्मियांकडून उत्साहात स्वागत

बारामती : राष्ट्रसंत प.पू. 108 पुलकसागरजी महाराजांचे आज बारामती नगरीत सर्वधर्मियांनी मोठ्या उत्साह व भक्तीभावाने स्वागत केले. आज बारामती शहराच्या वेशीवर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सर्वप्रथम महाराजांचे बारामतीकरांच्या वतीने स्वागत केले. 

आगामी चार्तुमासासाठी पुलकसागरजी महाराज चार महिने बारामतीत वास्तव्य करणार आहेत. आज बारामतीत त्यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. आज सकल जैन धर्मियांसमवेतच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री मुनिसुव्रत दिगंबर जैन देवस्थानच्या वतीने अध्यक्ष वालचंद संघवी, सचिव अजित वडूजकर,  खजिनदार भारत खटावकर,  विश्वस्त जयकुमार वडूजकर,  जवाहर वाघोलीकर,  संजय संघवी,  किशोर सराफ  आदींनी आज फलटण रस्त्यावर महाराजांचे स्वागत केले. महाराजांच्या स्वागतासाठी आज अनेक जिल्ह्यातून जैन बांधव बारामतीत आले होते. 

या प्रसंगी  बारामती अँग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, जयश्री सातव, मंगल सराफ, योगेश जगताप यांच्यासह चंद्रराव तावरे, माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे, बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, गटनेते सचिन सातव, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांच्यासह अनेक नगरसेवक विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. 

सर्वधर्मसमभावाचे तत्त्व आपल्या वाणीतून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत महत्वाचे काम पुलकसागरजी महाराजांकडून गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे. सर्वधर्मीय संत व गुरुंसमवेत महाराजांची सातत्याने चर्चा होत असते व मानवता, अहिंसा, समानता व सर्वधर्मसमभावाचा प्रचार पुलकसागरजी महाराज अत्यंत प्रभावीपणे करतात. 

अफाट वाचन व कमालीची कुशाग्र बुध्दीमत्ता या मुळे त्यांची प्रवचने ऐकणे हा एक वेगळा अनुभव असतो. गुरुदेव हे उत्तम वक्ते तर आहेतच, ते उत्तम व शीघ्र कवी देखील आहेत. अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेले असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गुरुदेव जरी जैन मुनी असले तरी ते आधुनिकतेची कास धरणारे असून बदलत्या काळात मानवाने कशी जीवनशैली अंगिकारली पाहिजे याचे बाळकडू ते आपल्या ओघवत्या भाषणातून सर्व समाजबांधवांना देत असतात. 

सन 1995 मध्ये प.पू. आचार्यश्री पुष्पदंत सागरजी महाराजांकडून प.पू. पुलकसागरजी महाराजांनी दीक्षा प्राप्त केली व सलग 22 वर्षे ते समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी भारतभर भ्रमण करीत आहेत. आगामी चार महिन्यांच्या काळात त्यांची अत्यंत ओघवत्या शैलीतील भाषणे बारामतीकरांना ऐकायला मिळतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com