बारामतीतील समृद्ध कोकरेला जर्मन विद्यापीठाची शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

शैक्षणिक गुणवत्ता व वैविध्यपूर्ण तांत्रिक प्रकल्पांमधील उत्कृष्ट कामगिरी या निकषावर त्याने ही शिष्यवृत्ती मिळविली आहे.

बारामती : तालुक्‍यातील पणदरेनजीकच्या हनुमानवाडी येथील समृद्ध श्रीहरी कोकरे याने जर्मन विद्यापीठाची दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती पटकाविली आहे.

अप्लाइड मॅकेनिक्‍स या विषयातील संशोधनासाठी जर्मनीतील झेलिफर्ड येथील क्‍लॉस्थल टेक्‍निकल विद्यापीठाने त्याला ही शिष्यवृत्ती जाहीर केली असून, 90 दिवसांच्या तेथील संशोधनासाठी समृद्ध कोकरे हा जर्मनीला रवाना झाला आहे.

शैक्षणिक गुणवत्ता व वैविध्यपूर्ण तांत्रिक प्रकल्पांमधील उत्कृष्ट कामगिरी या निकषावर त्याने ही शिष्यवृत्ती मिळविली आहे. तो सध्या तिरुचिरापल्ली येथील एनआयटीमध्ये प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंग शाखेत बीटेक पदवीच्या चौथ्या वर्षात शिकतो आहे. त्याचे शालेय शिक्षण बारामतीच्या बालविकास मंदिर येथे झाले असून, शालेय तसेच अभियांत्रिकी शाखेतही त्याने प्रथम क्रमांक सातत्याने मिळवला आहे.
 

Web Title: pune news baramati news pandare student german university scholarship