नेचर बदलो, फ्यूचर बदल जायेगा: पुलकसागरजी महाराज

मिलिंद संगई
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नेल्सन मंडेला, मदर तेरेसा किंवा लता मंगेशकर यांच्याकडे सौंदर्य नव्हते पण त्यांचे कर्तृत्वच इतके महान होते की त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कार्याची दखल जगाला घ्यायला लावली, त्या मुळे जोडीदार भलेही फार सुंदर किंवा श्रीमंत नसला तरी चालेल पण कुटुंबियांना सांभाळून घेणारा हवा, असे महाराजांनी सांगितले. 
ललिता पवार नव्हे निरुपा रॉय बना....

बारामती : स्वतःच्या स्वभावात आणि दैनंदिन व्यवहारात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश प्राप्त झाले, तर माणसाचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. कोणताही तंत्र मंत्र नाही तर आपल्या स्वभावातील चांगला बदलच आपले नशीब बदलवू शकतो, नेचर बदलो...फ्यूचर बदल जायेगा....असा संदेश राष्ट्रसंत 108 पुलकसागरजी महाराजांनी दिला.

बारामतीत चार्तुमासानिमित्त दिगंबर जैन बांधवांच्या वतीने सुरु असलेल्या ज्ञानगंगा महोत्सवात ते बोलत होते. मुलीचे घर कसे सुरक्षित ठेवाल हा महाराजांच्या व्याख्यानाचा विषय होता. बहुसंख्य मुली ज्या सासरी जातात ते सासर खराब नसते तर मुलीवर आई वडीलांनी केलेले संस्कार व्यवस्थित नसतात त्या मुळेच मुलीला अडचणींना सामोरे जावे लागते, असे महाराज म्हणाले. सासरी गेल्यानंतर त्या घराला स्वर्ग बनवायचे की नरक हे त्या मुलीच्याच हातात असते आणि त्या मुलीच्या आईवडीलांची मनोधारण आणि तिच्यावर झालेले संस्कारच हे निश्चित करतात. 
मुलांना आणि मुलींनाही सुंदर किंवा पैसा असणारा जोडीदार हवा असतो ही गैरसमजूत आहे, आपल्या जोडीदाराला समजून घेणारा आणि माया करणारा जोडीदारच प्रत्येकाला अपेक्षित असतो ही बाब लक्षात घ्यायला हवी, असे महाराजांनी नमूद केले. आपल्या मुलीचे लाड जरुर करा, तिच्या गरजाही पूर्ण करा पण मोठ्यांचा आदर, परस्परांप्रती स्नेह ठेवण्यासह दुस-याच्या घरात गेल्यावर समजून घेण्याची सवय आपल्या मुलीला आई वडीलांनी लावायला हवी, अन्यथा लग्नानंतर मुलीचे सासर हे स्वर्ग बनू शकणार नाही. 

नेल्सन मंडेला, मदर तेरेसा किंवा लता मंगेशकर यांच्याकडे सौंदर्य नव्हते पण त्यांचे कर्तृत्वच इतके महान होते की त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कार्याची दखल जगाला घ्यायला लावली, त्या मुळे जोडीदार भलेही फार सुंदर किंवा श्रीमंत नसला तरी चालेल पण कुटुंबियांना सांभाळून घेणारा हवा, असे महाराजांनी सांगितले. 
ललिता पवार नव्हे निरुपा रॉय बना....

सूनेवर प्रेम करायला सासूने शिकायला हवे आणि सासू सासरेही जेव्हा बाहेर जातील तेव्हा त्यांनी सूनेसाठी काहीतरी भेटवस्तू आठवणीने आणायला हवी, यातून स्नेह वाढतो, प्रेम वाढते, असे सांगत महाराजांनी सासूने ललिता पवार सारखी नाही तर निरुपा रॉय सारखी सासू बनण्याचा प्रयत्न करा, असे उदाहरण या वेळी दिले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Pune news Baramati news Pulaksagarji maharaj