शेतकऱ्यांना अनुदान देत नसल्याच्या निषेधार्थ बारामतीत सेनेचे 'ढोल बजाओ'

मिलिंद संगई
सोमवार, 10 जुलै 2017

बँकेला 22 जून रोजी शासनाने दहा हजार रुपये अनुदानाच्या मदतीबाबत निर्देश दिलेले असतानाही बँकेने अद्याप एकाही शेतकऱ्याला मदत केलेली नाही

बारामती : राज्य शासनाने पेरण्यांसाठी दहा हजारांचे अनुदान जाहीर करूनही जिल्हा बँका हे अनुदान शेतकऱ्यांना देत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज बारामतीतील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दारात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, उपजिल्हाप्रमुख अँड. राजेंद्र काळे, तालुकाप्रमुख बाळासाहेब शिंदे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पिंगळे, युवा सेना जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सुनीता खोमणे, शहरप्रमुख संगीता पोमणे, विश्वास मांढरे, शहाजी दळवी, सतीश काटे, राजेंद्र साळुंके, अनिल शेडगे, सदाशिव परकाळे, पप्पू काटे, गजानन ढमाळ, उमेश दुबे, सुदाम गायकवाड, हेमंत शहा, दादा दळवी आदी उपस्थित होते. 

बाबासाहेब धुमाळ व राजेंद्र काळे यांनी व्यवस्थापक इंद्रसेन पवार यांना याबाबत निवेदन दिले. बँकेला 22 जून रोजी शासनाने दहा हजार रुपये अनुदानाच्या मदतीबाबत निर्देश दिलेले असतानाही बँकेने अद्याप एकाही शेतकऱ्याला मदत केलेली नाही, याचा त्यांनी निषेध केला. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पेरणीसाठी तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने यावेळी करण्यात आली. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: pune news baramati news shiv sena dhol bajao andolan