बाजार समित्यांच्या निवडणुका 31 मार्चपूर्वी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे -  ""अनेक वर्षांपासून ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपली आहे, त्यांना तूर्तास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मतदार याद्यांना आधारजोडणी आणि निवडणूक नियमावलींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येत्या 31 मार्चपूर्वी राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका "इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन'वर घेतल्या जातील,'' अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी केली. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला देशमुख आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या रखडलेल्या निवडणुकीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, ""सहकार खात्याच्या छाननीत राज्यात 11 हजार सहकारी संस्था कागदावरच असल्याचे दिसले. त्यामध्ये काही विशिष्ट कुटुंबीयांच्या घरातील सदस्यांच्या "पिशव्या'तल्या संस्था होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समित्यांच्या मुदती संपूनही संचालक मंडळाच्या निवडणुका घेतल्या जात नव्हत्या. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याची किमान 10 गुंठे जागा नावावर आहे. तसेच, सलग तीन वर्षे बाजार समितीत शेतमाल विक्री व्यवहार केलेल्यांना मतदानासाठी पात्र समजले जाईल. या निवडणुकांची अंतिम नियमावली तयार झाली आहे. यामध्ये बनावट मतदानाला आळा घालण्यासाठी मतदार याद्यांना "आधारजोडणी' करून "थंब इम्प्रेशन'द्वारे मतदान घेण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात येईल. सर्व निवडणुका "इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन'वर घेतल्या जातील.'' 

अजित पवारांना कशाची भीती? 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याला विरोध आहे. त्यावर देशमुख म्हणाले, ""गेल्या 15 वर्षांमध्ये सहकारी कारखाने, दूधसंघ, सूतगिरण्या, खरेदी-विक्री संघाची दुरवस्था कोणी केली? खासगी कारखाने, दूधसंघ कोणत्या पक्षातील नेत्यांचे आहेत? ज्या शेतकऱ्यांसाठी या संस्था काढल्या, त्यांना आमच्या सरकारने थेट मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे अजित पवार विरोध का करतात, त्यांना नेमकी कशाची भीती आहे?''

Web Title: pune news Bazar Samiti election