पिंपरी: मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण

संदीप घिसे
शनिवार, 24 मार्च 2018

केतन अशोक गायकवाड (वय २६ रा. एच. कॉलनी, पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंपरीचे पोलिस निरीक्षक गुन्हे मसजी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील एका रुग्णालयात केतन यांचा मृत्यू झाला.

पिंपरी : तरुण रुग्ण दगावल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या चुकीच्या वर्तनामुळे संतापलेल्या मयत तरुणाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. ही घटना पिंपरीतील एका रुग्णालयात घडली.

केतन अशोक गायकवाड (वय २६ रा. एच. कॉलनी, पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंपरीचे पोलिस निरीक्षक गुन्हे मसजी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील एका रुग्णालयात केतन यांचा मृत्यू झाला. बोलणाऱ्या रूग्णाचा अचानक मृत्यू कसा झाला? याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरकडे विचारणा केली. मात्र डॉक्टरने समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे मयताच्या नातेवाईक महिला परिचारिकांने डॉक्टरने काय उपचार केले हे पाहण्यासाठी कागदपत्र बघण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका डॉक्टरने त्या महिलेचा हात पिरगळला. ही घटना पाहताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली.

सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून डॉक्टरला नातेवाईकांपासून वाचवले. याबाबत शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत त्या रुग्णालयात चांगलाच गोंधळ चालला होता. नातेवाईक व डॉक्टर या दोन्हींकडूनही काहीच तक्रार आली नसल्याचे पोलिस निरीक्षक मसाजी काळे यांनी सांगितले.

Web Title: Pune news beaten doctor in pimpri

टॅग्स