मंचरमध्ये महिलांकडून बिअर शॉपी बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

मंचर - मंचर हद्दीत मुळेवाडी येथे सुरू असलेले बिअर शॉपी दुकान संतप्त महिलांनी मंगळवारी (ता. ६) बंद पाडले. दुकानासमोर भजन सादर करून बिअर शॉपी बंद झाले पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. महिलांनी रविवारी (ता.४) बिअर शॉपी बंदची मागणी केली होती; पण दुकानदाराने महिलांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून दुकान सुरू ठेवल्याने मंगळवारी दुकानाचा दरवाजा तोडून बिअरच्या बाटल्या फोडून टाकल्या. 

गेल्या तीन महिन्यांपासून येथे बिअर शॉपी सुरू आहे. परिसरात समाज मंदिर व प्राथमिक शाळा आहे. या बिअर शॉपीच्या मालकाला रविवारी महिलांनी समज दिली होती. सरपंच दत्ता गांजाळे यांनी त्या वेळी शॉपीला कुलूपही लावले होते; पण दुकानदाराने दुकान सुरूच ठेवले. त्यामुळे मंगळवारी शंभरहून अधिक महिला बिअर शॉपीसमोर गेल्या. महिलांना पाहून दुकान बंद करून मालक पळून गेला. त्यामुळे महिलांचा राग अनावर 
झाला. महिलांनी दुकानाच्या शटरची कुलूपे तोडून बिअरच्या बाटल्या फोडल्या. तेथे दारूच्या बाटल्यांचा साठा मिळाला आहे. गांजाळे आणि सहायक फौजदार आर. पी. कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. बिअर शॉपीचे दुकान येथे ठेवणार नाही, असे गांजाळे यांनी सांगितले.  

दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले होते. त्या वेळी महिलांनी केलेल्या प्रश्‍नांच्या भडिमारापुढे ते हतबल झाल्याचे दिसत होते. 

‘...म्हणूनच पाठराखण’
महिला आणि गावकऱ्यांचा विरोध असल्याने राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभागाचे उपअधीक्षक यांना पत्र देऊन संबंधित बिअर शॉपीचे दुकान बंद करावे, अशी मागणी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केली होती. या दुकानाला ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही. विनापरवाना बिअर शॉपी सुरू आहे, असे पत्रात गांजाळे यांनी नमूद केले होते. 

Web Title: pune news beer shoppee close by women