आदिवासी वसतिगृहातील विदयार्थ्यांचे आंदोलन मागे

संदीप जगदाळे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

आदीवासी वसतिगृहाचे गृहपाल राजकुमार राख यांची तातडीने बदली

हडपसर (पुणे): आकाशवाणी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विदयार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी अश्वासन आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांनी दिले. तसेच बेजबाबदार वसतिगृहाचे गृहपाल राजकुमार राख यांची तातडीने बदली केली. अधिकारी व संतप्त विदयार्थ्यांध्ये तीन तास झालेल्या चर्चेनंतर अखेर सोमवारी (ता. 9) रात्री उशीरा विदयार्थ्यांनी तीन दिवस सुरू असलेले अमरण उपोषण मागे घेतले. मात्र, पंधरा ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा विदयार्थ्यांनी दिला.

सोनकवडे यांनी विदयार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एका समितीचे गठण केले. समितीच्या अहवालात दोषी असणा-यांवर कारवाई करणार असल्याचे नमूद केले.

विदयार्थ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये वसतिगृहातील बाथरूम व स्वच्छतागृहांची संख्या विदयार्थ्यांच्या संख्येनुसार वाढवावी व त्यांची स्वच्छता ठेवावी. वीज व पाण्याची व्यवस्था करावी. गृहपाल वारंवार गैरहजर असल्याने त्यांची बदली करावी, शासनाच्या नियमानुसार सकस व पुरेसा आहार मिळावा, स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नेमावा, पिण्याच्या टाक्यांची स्वच्छता नियमीतपणे करावी, भाडयाच्या इमारतीत हे वसतीगृह असून येथे सुविधा नाहीत. त्यामुळे शासनाने वसतिगृहाची इमारत स्वतः बांधावी, विदयार्थ्यांसाठी संगणक व वायफाय सुविधा द्यावी, वसतिगृह ऑनलाईन प्रवेश प्रकीयेतील तांत्रीक दोष दुरू करावेत, विदयार्थ्यांसाठी वैदयकीय अधिका-याची सोय करावी, शैक्षणिक साहित्य व निर्वाह भत्ता वेळेवर द्यावा, ग्रंथालय अद्यावत करावे यांचा समावेश आहे.

दरम्यान, संतप्त विदयार्थी व अधिकारी यांच्यांमध्ये अनेकदा शाब्दीक चकमकी झाल्या. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, अधिका-यांना देखील जावून देणार नाही अशी ठाम भूमीका विदयार्थ्यांनी घेतली होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यातच राष्ट्रवादी पक्षाचे माजी उपमहापौर निलेश मगर व हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष यांना वसतिगृहातील समस्या सांगितल्या. त्यामुळे या आंदोलनास राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला. तसेच विदयार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते.

विदयार्थ्यांसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी. व्ही. कालेकर, निरिक्षक योगेश खंदारे, नगरसेवक योगेश ससाणे व माजी उपमहापौर निलेश मगर यांनी सहभाग घेतला.

यावेळी मांजरी येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह व हडपसर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विदयार्थीनींनी देखील आपल्या समस्यांचा पाढा प्रकल्प अधिका-यांसमोर वाचला. त्यांनाही सर्व समस्या सोडवू असे अश्वास सोनवकडे यांनी दिले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news Behind the movement of tribal hostel students