'कष्टकरी व सरकारी कर्मचाऱयांचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज'

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 23 जून 2017

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनचे (इंटक) कार्यकर्ता शिबिर पं. नेहरू सांस्कृतिक भवनात संपन्न झाला. या शिबिराचे उदघाटन जगताप यांच्या हस्ते झाले.

पुणे: "कष्टकरी व सरकारी कर्मचारी यांचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी मी आत्तापर्यन्त प्रयत्नशील राहिलो आहे, भविष्यातही राहील. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी याच सरकारविरुद्ध नाही, तर माझे सरकार असले तरी रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही." असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनचे (इंटक) अध्यक्ष भाई जगताप यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनचे (इंटक) कार्यकर्ता शिबिर पं. नेहरू सांस्कृतिक भवनात संपन्न झाला. या शिबिराचे उदघाटन जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, अॅड. अभय छाजेड, शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, सुरेश अगरवाल, गोविंद थोपटे, बाबासाहेब भोसले, डी. डी. आडे उपस्थित होते.

जगताप म्हणाले, "कामगारला जात, धर्म, पंथ किंवा पक्ष नसतो. कामगार चळवळ महत्वाची आहे. आपले संघटन पहिल्यापासुन आहे, मात्र त्यापुढील आव्हाने नवीन आहेत. आधुनिक पद्धतीचा वापर करुन ती आव्हाने सोडवुयात. कामगारांच्या हक्काच्या जागा कमी होत आहेत, जागा भरल्या जात नाहीत, असे अनेक प्रश्न मी समजुन घेणार आहे, ते प्रश्न सोडविण्यास माझे प्राधान्य असेल."

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण

Web Title: pune news bhai vaidya talking about employees issue