पालखीत विघ्न आणल्याने भिडे गुरूजींवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

पुणे - "पालखी सोहळ्यात विघ्न आणणाऱ्या भिडे गुरूजी आणि त्याच्या बगलबच्च्यांना या पुढे पुण्यात प्रवेश करण्यापासून रोखावे', अशी मागणी महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केली. दरम्यान, शहर पोलिसांनी भिडे गुरूजी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

गोखले चौकात रविवारी सायंकाळी श्री शिवप्रतिष्ठान धारकरी पथकाने संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालखी सोहळा सुमारे अर्धा तास थांबला होता. या पार्श्‍वभूमीवर डेक्कन पोलिसांनी भिडे गुरूजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत तुपे म्हणाले, ""भिडेंचे खरे नाव मनोहर आहे; परंतु त्यांनी स्वतःच "संभाजी' असे लावून घेतले आहे. सुमारे 350 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेला पालखी सोहळा बंद पाडण्यास ते निघाले आहेत. जे काही उद्योग करायचे आहेत, ते त्यांनी सांगलीत करावेत. पुण्यात उगाच लुडबूड करू नये.'' 

शिंदे म्हणाले, ""तलवारी घेऊन वारकरी सोहळ्यात घुसखोरी करणाऱ्या भिडेचा आम्ही निषेध करतो. हे पथक घुसले तेव्हा पोलिस झोपले होते का ? आगामी काळात गणेशोत्सव आहे. भिडे पुन्हा येऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुण्यात येण्यास प्रतिबंध करावा. भिडेला गुरूजी म्हणण्याचे काही कारण नाही. त्याच्यामुळे पालखी सोहळ्यातील दिंड्यांना झालेल्या त्रासाबद्दल पुणेकरांच्यावतीने आम्ही माफी मागतो.'' 

Web Title: pune news Bhide Guruji