कशी मी, अशी मी

प्रशांत चवरे
रविवार, 11 मार्च 2018

समाजामध्ये स्त्रियांना बऱ्यांच वेळा केवळ स्त्री म्हणुन दुय्यम वागणुक दिली जाते. स्त्रीला माणुस म्हणुन स्विकारल्यास स्त्री पुरुष भेदाभेद कमी होण्यास मदत होईल

भिगवण -  स्त्री ही मुलगी, बहीण, पत्नी, आई अशा विविध भुमिका यशस्वीरित्या निभावत असते. स्त्रीलाच तिच्यामध्ये असणाऱ्या शक्तींच्या विविध आविष्काराची जाणीव नसते; त्यामुळे अनेकवेळा विविध गुणसंपन्न असणाऱ्या स्त्रिला कशी मी अशी मी असा प्रश्न पडतो. स्त्री ही कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा कणा असल्यामुळे समाजाने स्त्रियांचा योग्य सन्मान दिला पाहिजे असे प्रतिपादन बारामती येथील व्याख्यात्या संगिता काकडे यांनी केले. 

येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'कशी मी, अशी मी'  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच हेमाताई माडगे होत्या तर  दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला जाधव, रोटरी क्लबच्या सचिव वर्षा बोगावत, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी शेंडगे, वंदना शेलार, अरुणा धवडे उपस्थित होत्या. काकडे पुढे म्हणाल्या, समाजामध्ये स्त्रियांना बऱ्यांच वेळा केवळ स्त्री म्हणुन दुय्यम वागणुक दिली जाते. स्त्रीला माणुस म्हणुन स्विकारल्यास स्त्री पुरुष भेदाभेद कमी होण्यास मदत होईल.   

यावेळी आदर्श सरपंच सारिका बंडगर, अॅड. स्वाती गिरंजे, विजया ढवळे यांचा विशेष कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबच्या निशिगंधा कुदळे, निलिमा बोगावत, दिपाली भोंगळे, रेखा खाडे, डॉ. शिवरानी खानावरे, स्वप्नाली गांधी व सुनिता खाडे यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे गाण्यावर नृत्य सादर करत त्यांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. अश्विनी गांधी, पुजा देवकाते, आशा चौधरी, तेहमीन शेख, संगिता भापकर यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक वर्षा बोगावत यांनी केले सुत्रसंचालन स्मिता बोगावत व मिना बंडगर यांनी केले तर आभार वैशाली बोगावत यांनी मानले.

Web Title: pune news bhigvan women's day