रोड रोबरी करणाऱ्या टोळीविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

भिगवणः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह राज्यातील इतरही महामार्गावर रोड रोबरी करणाऱ्या टोळीतील तीन अट्टल गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी दिली. रोड रोबरी करणाऱ्या टोळीविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करुन पोलिसांनी अशा गुन्हेगारांना चांगलाच दणका दिला आहे.

भिगवणः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह राज्यातील इतरही महामार्गावर रोड रोबरी करणाऱ्या टोळीतील तीन अट्टल गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी दिली. रोड रोबरी करणाऱ्या टोळीविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करुन पोलिसांनी अशा गुन्हेगारांना चांगलाच दणका दिला आहे.

टोळी प्रमुख ईश्वर चंदू दुबळे (वय. ३०), लहु संतराम इटकर (वय. २३) व गोटयां धोंडिराम इटकर (रा. सर्व सोनारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) असे रोड रोबरी प्रकरणी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांविरुध्द, पुणे, सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रोड रोबरीचे गंभीर गु्न्हे दाखल आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी: १६ डिसेंबर २०१७ रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खडकी (ता.दौंड) येथून निमगांव केतकी (ता.इं दापुर) कडे जाण्यासाठी राहुल जगन्नाथ भोसले थांबले होते. त्यावेळी नंबर प्लेट नसलेली बोलेरी गाडी त्यांच्या जवळ थांबवून त्यांना गाडीमध्ये बसविले. गाडी पुढे आल्यानंतर श्री. भोसले यांचे तोंडावर मारहाण करुन त्यांचेकडील सॅमसंग कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम अशी एकुन तेरा हजार आठशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला होता. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुध्द भिगवण पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला होता. त्याच दिवशी अशाच प्रकारचा रोड रोबरीचा गुन्हा वेळापुर (जि. सोलापूर) पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाला होता. या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी ईश्वर चंदु दुबळे (वय.३०) व लहुन संतराम ईटकर(वय.२३) यांनी अटक केली होती.

सदर गुन्ह्यातील आरोपींना भिगवण पोलिसांकडे स्थलांतरीत केल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड व पोलिस उपनिरीक्षक बी.एन. पवार यांनी गुन्हयाचा तपास करुन या गुन्ह्यातील तिसरा आरोपी गोट्या धोंडीराम इटकर यासही अटक केली होती. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली होती. व पोलिसांनी गुन्हेगारांकडुन गुन्ह्यातील सुमारे पाच हजार चारशे रुपयांचा माल आरोपींनी हस्तगत केला होता. अधिक तपास केला असता टोळीप्रमुख ईश्वर चंदु दुबळे याचेवर कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ श्रीगांव पोलिस ठाणे व कागल पोलिस ठाणे तसेच सोलापूर जिल्ह्यातील वेळापुर पोलिस ठाण्यामध्येही रोड रोबरीचे गुन्हे दाखल होते.

गुन्हेगारांची पार्श्वभुमी विचारात घेऊन पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक सुवेझ हक, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले व बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचेकडे आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर करीत आहेत.

याबाबत बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर म्हणाले, रोड रोबरी साऱख्या गंभीर प्रकरामध्ये टोळी प्रमुख ईश्वर चंदु दुबळे पोलिसांना हवा होता. रोड रोबरी करणाऱ्या टोळीविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई केल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्यास निश्चित मदत होईल.

Web Title: pune news bhigwan action under the mocca against the road robbery