भीमाशंकर विकास आराखड्यास १४८ कोटी रुपयांची मान्यता: वळसे पाटील

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 2 मार्च 2018

मंचर (पुणे): श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरण पूरक विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने १४८ कोटी ३४ लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत आराखड्यातील सर्व कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर (पुणे): श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरण पूरक विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने १४८ कोटी ३४ लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत आराखड्यातील सर्व कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

वळसे म्हणाले, 'जिल्हाधिकार्‍यांनी १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीला आराखडा सादर केला होता. बुधवारी (ता. २८) शिखर समितीने आराखड्याला मान्यता दिली आहे. येथील देवस्थान तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा आहे. येथे दरवर्षी साधारणत: २५ लाख भाविक दर्शनासाठी येतात, हे लक्षात घेऊन विकास आराखडा शासनाने तयार केला आहे. आराखड्यातील प्रस्तावित ११ कामे तीन टप्प्यांमध्ये ३१ मार्च 2021 पर्यंत पूर्ण करायची असून, सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. भीमाशंकरचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून, वन्यजीव अभयारण्य म्हणून राखीव वनात मोडतो. त्यामुळे आराखड्यातील ज्या विकासकामांना भारतीय वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत मान्यता घेण्याची गरज आहे, ती सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी घ्यायची आहे.

आरखड्यातील कामे करताना ज्या खाजगी जमिनी संपादित करावयाच्या आहेत, त्यासंबंधीचे मालकांचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. तसेच भीमाशंकर येथील बसस्थानकाचे नूतनीकरण करताना त्यासाठी उत्तम वास्तुविशारद नेमण्यात यावा. आराखड्यातील ज्या कामांना कुंपण भिंत आहे, त्या भिंती बोलक्या केल्या जाणार आहेत. ज्योतिर्लिंगाचे महत्त्व, वन, वृक्ष आणि वन्यजीव संपदा याची माहिती, स्वच्छतेचे संदेश त्यावर देण्यात येणार आहेत. देवस्थानला 2030 मध्ये येणार्‍या भाविकांची संख्या विचारात घेऊन आराखड्यातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारणाच्या सुविधा, वाहनतळ विकास, आरोग्य केंद्राचे काम, तसेच स्वच्छतेच्या सुविधा यांचा विकास केला जाणार आहे.

होणारी विकासकामे
भीमा नदी उगमस्थानाजवळील परिसराचे सुशोभीकरण, पोलिस स्टेशन इमारत, सामूहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरी मार्ग, सार्वजनिक शौचालय, हेलिपॅड, काँक्रिट रस्ते, परिसर सुधारणा, सीमाभिंत, , दुकान गाळे, चप्पल स्टँड, सल्लागार शुल्क, इ. तसेच वनेतर वापरासाठीचा खर्च आणि खासगी जमीन भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी 63.06 कोटींची तरतूद करण्यात आली. पथदिवे, सीसीटीव्ही, डिजिटल डिस्प्ले, साउंड सिस्टिम, अग्नी प्रतिबंधक उपाययोजना, पायरी मार्ग येथील विद्युतीकरण आणि प्रकाश व्यवस्थेवर ७ कोटी १७ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. मुख्य मंदिर संंवर्धन, नवीन दगडी मंडप बांधकाम, सीमाभिंत, सर्व तीर्थ व मोक्षकुंड जतन संवर्धन, उर्वरित ४  कुंड आणि जलमार्गाचे सुशोभीकरण, भाविकांसाठी पाय धुण्याची व्यवस्था, दगडी पायर्‍यांसाठी ३४ कोटीं ९७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. भूमिगत केबल, रोहित्र आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या रूमसाठी ८३ लाख रुपयांची तरतूद आहे. कोंढवळ तालावातून पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरणासाठी १९ कोटी ९५ लाख, आरोग्य पथक इमारत बंधकाम, वाहनतळ, प्रीफॅब्रिकेटेड प्रसाधनगृह, सुरक्षा चौकी, बॅरिकेड्ससाठी दोन कोटी ८८ लाख रुपये,

पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, घनकचरा आणि मलनिस्सारणाचे काम करण्यासाठी नऊ कोटी ६९ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आरओ युनिट बसविण्यासाठी २५ लाख रुपये, भाविकांसाठी ४० मिडी बसेस अतिरिक्त पुरवठ्यासाठी चार कोटी ७५ लाख रुपये, महादेव वन कामे, वन विश्रामगृह व एमटीडीसी कॉटेजेस परिसरातील कामे, वन क्षेत्रातील पायवाटांसाठी चार कोटी ५२ लाख रुपये, तर मोबाईल सेवा बळकटीकरणासाठी तीस लाख रुपये.

Web Title: pune news bhimashankar mandir development dilip walse patil