'भीमाशंकर'च्या ऊस पीक स्पर्धेचे बक्षीस वितरण

सुदाम बिडकर
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पारगाव (पुणे) : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गाळप हंगाम 2016-17 मध्ये ऊस उत्पादकता वाढ योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या ऊस पीक स्पर्धेत जास्तीत जास्त ऊस गाळपास देणाऱ्या शेतकऱ्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर लक्ष्मण पिंगळे (वडगाव काशिंबेग, ता. आंबेगाव) यांना, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक उद्योजक व प्रगतिशील शेतकरी गुलाबराव धुमाळ (चिंचोली मोराची, ता. शिरूर) यांना कारखान्याचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

दत्तात्रेयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथे वळसे पाटील यांच्या हस्ते ऊस पीक स्पर्धेतील पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, संचालक प्रदीप वळसे पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, सभापती उषा कानडे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे आदी उपस्थित होते.

विजेत्या गावांना प्रथम क्रमांकास 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 40 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 30 हजार रुपये आणि शेतकऱ्यांसाठी प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 10 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 5 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.

जास्तीत जास्त ऊस गाळपास देणारे शेतकरी पुढीलप्रमाणे : प्रथम- शंकर पिंगळे, द्वितीय- गुलाबराव धुमाळ, तृतीय- राजेश ढोबळे (पारगाव, ता. आंबेगाव). प्रती एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणारे शेतकरी : आडसाली : प्रथम- राजू थिटे (काठापूर खुर्द, ता. शिरूर), द्वितीय- संदीप हिंगे (अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव), तृतीय- शंकर थिटे (काठापूर खुर्द, ता. शिरूर). पूर्व हंगाम : प्रथम- शरद बांगर (खडकी, ता. आंबेगाव), द्वितीय- मंगेश भालेराव (कळंब, ता. आंबेगाव), तृतीय- बाळू डावखर (शिरोली, ता. जुन्नर). सुरू : प्रथम- सत्यवान थोरात (एकलहरे, ता. आंबेगाव), द्वितीय- तानाजी बारवे (चास, ता. आंबेगाव), तृतीय- नाना नरवडे (खंडाळे, ता. शिरूर). खोडवा : प्रथम- छाया ढोमे (पिंपरखेड, ता. शिरूर), द्वितीय- नाथा करंडे (काठापूर बुद्रुक, ता. आंबेगाव), तृतीय- चतुराबाई खोमणे (निमगाव दुडे, ता. शिरूर). "को. 86032' या जातीचे एकरी 90 टनाच्या पुढे ऊस उत्पादन घेणारे शेतकरी (प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस) प्रथम- सतीश रोडे (लाखणगाव), द्वितीय- महादेव इंदोरे (चांडोली खुर्द), तृतीय- दत्तात्रेय खानदेशे व चतुर्थ ज्ञानेश्वर इंदोरे. एका गावातून दहा हजार टनापेक्षा जास्त व एकूण उसाच्या 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऊस गाळपास दिलेली गावे : प्रथम- खडकी (ता. आंबेगाव), द्वितीय- काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव). सर्वाधिक ऊस पुरवठा करणारी गावे : प्रथम- पिंपरखेड (ता. शिरूर), द्वितीय- निरगुडसर (ता. आंबेगाव), तृतीय- काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव).

Web Title: pune news bhimashankar sugar factory and farmer award