'कितीही हल्लाबोल केला तरी राज्यात पुन्हा भाजपाचेच सरकार'

संतोष आटोळे 
सोमवार, 29 जानेवारी 2018

निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गावडे पवार एकाच व्यासपिठावर..
कटफळ येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकमेकांच्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल राजेंद्र पवार व बाळासाहेब गावडे पहिल्यांदाच एका व्यासपिठावर आले. त्यांच्यातील राजकिय जवळीकीची चर्चा यापूर्वी अनेक जाणकार नेहमीचे करीत असतात.कटफळ येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघेही एकत्र आल्यानंतर झालेल्या कार्यक्रमाची कटफळ बरोबरच परिसरातील गावांमध्ये जोरदार चर्चा होत होती.

शिर्सुफळ : राज्यातील विरोधकांनी सरकार विरोधात कितीही हल्लाबोल केला तरी राज्यात 2019 ला पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येईल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी केले.

कटफळ (ता.बारामती) येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंर्तगत जानाई मंदिर प्रवेश कमान ते रांधवण वस्ती या रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या शुभारंभ बाळासाहेब गावडे व अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी संवाद साधताना गावडे बोलत होते. यावेळी सरपंच सारिका मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, सर्व ग्रामपंचायत सद्स्य, कांतिलाल माकर, बबन कांबळे, लक्ष्मण झगडे, विश्वास मोकाशी, बाळासो आटोळे, कांतीलाल आटोळे, संजय मोरे, संजय मोकाशी, दादा आटोळे, ग्रामसेवक सतिश बोरावके, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कटफळ ग्रामपंचायती अंर्तगत येणाऱ्या जानाई मंदिर ते रांधवण वस्ती या गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या या तीन किलोमीटर रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातुन सुमारे 98 लाख रुपये निधी मंजुर झाला आहे. या रस्त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासुन होत असलेली गैरसोय दुर होणार आहे.याबाबत संबंधितांमधुन समाधान व्यक्त होत आहे. यावेळी बोलताना गावडे यांनी सरकारच्या माध्यमातुन कटफळ गावासह परिसरातील गावांच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणू अशी ग्वाही दिली.तर राजेंद्र पवार यांनी बोलताना विकासकामांमध्ये राजकारण न करता कामे विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संग्राम मोकाशी यांनी तर आभार भारत मोकाशी यांनी मानले.             

निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गावडे पवार एकाच व्यासपिठावर..
कटफळ येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकमेकांच्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल राजेंद्र पवार व बाळासाहेब गावडे पहिल्यांदाच एका व्यासपिठावर आले. त्यांच्यातील राजकिय जवळीकीची चर्चा यापूर्वी अनेक जाणकार नेहमीचे करीत असतात.कटफळ येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघेही एकत्र आल्यानंतर झालेल्या कार्यक्रमाची कटफळ बरोबरच परिसरातील गावांमध्ये जोरदार चर्चा होत होती.

Web Title: Pune news BJP leader Balasaheb Gawade statement