भाजप, रिपब्लिकन युतीतर्फे हिमाली कांबळे यांना उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - महापालिकेच्या कोरेगाव पार्क- घोरपडी प्रभागातील (क्र. 21) पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) युतीतर्फे हिमाली कांबळे यांची उमेदवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या त्या कन्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. 

दलित चळवळीतील नवनाथ कांबळे यांचे योगदान लक्षात घेऊन ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकनचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी हिमाली यांच्या उमेदवारीची पत्रकार परिषदेत घोषणा केली. या प्रसंगी नगरसेवक उमेश गायकवाड, सोनाली लांडगे, तसेच बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे आदी उपस्थित होते. हिमाली या वाणिज्य शाखेत पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. 

हिमाली या कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार का, असे विचारले असता बापट म्हणाले, ""भाजप आणि रिपब्लिकन पक्षाची महापालिका निवडणुकीपूर्वीपासूनच युती आहे. या पोटनिवडणुकीबाबत रिपब्लिकनचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.'' 

कॉंग्रेसकडून पाठिंबा जाहीर 
नवनाथ कांबळे यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कन्या हिमाली यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, अशी घोषणा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रवारी केली. 

राष्ट्रवादी निवडणूक लढविणार 
या पोटनिवडणुकीत भाजपला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार देणार आहे, असे पक्षाच्या शहराध्यक्ष आणि खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी सांगितले. पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून लवकरच उमेदवार जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: pune news bjp RPI candidate pmc