हडपसर : दृष्टिहिनांच्या लेखनिंकाचा सत्कार

संदीप जगदाळे
शनिवार, 24 मार्च 2018

कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील दहावीच्या विदयार्थ्यांना रायटर्स म्हणून मदत करणा-या विदयार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात सोमवंशी बोलत होते.

हडपसर : दहावीतील दृष्टिहिन मुलांना गेनबा सोपानाराव मोझे शाळा गेल्या दहा वर्षांपासून रायटर्स पुरवते. त्यामुळे दृष्टिहिन मुले व सामान्य मुले यांच्यात मैत्री घट्ट होते. या उपक्रमामुळे दृष्टिहिन मुलांची सोय होते. मात्र त्याबरोबरच आमच्या मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व आपण समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना निर्माण होण्यास मदत होते. तर दृष्टिहिन मुले व सामान्य मुले यांच्या मैत्रिमुळे दृष्टिहिन मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते. त्यामुळे शालेय जीवनापासूनच प्रत्येक शाळेने दिव्यांग विदयार्थ्यांना मदत करून खारीचा वाटा उचलायला हवा, असे मत गेनबा सोपानराव मोझे शाळेचे प्राचार्य संजय सोमवंशी यांनी व्यक्त केले.

कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील दहावीच्या विदयार्थ्यांना रायटर्स म्हणून मदत करणा-या विदयार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात सोमवंशी बोलत होते.

याप्रसंगी पुणे अंधशाळेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, पर्यवेक्षक मारूती दसगुडे, अजित लेंबे, राजाराम जगताप, प्रतिभा कोरपे, संगिता माटे, भारती चोभारकर, दामोदर सरगम, मनिषा शेवाळे, गणेश पाटील, अमृत लोखंडे, संतोष जगताप, रंगनाथ गजरे, रामेश्र्वर खिळे, रेखा राउत उपस्थित होते.

Web Title: Pune news blind people in hadapsar