Pune News : पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे माझ्या हृदयात ब्लॉकेज; महिलेची पोलिसांत तक्रार | Pune News Blockage in my heart because of Husbands taunts Pune woman launch complaint to Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Blockage Pune Woman
Pune News : पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे माझ्या हृदयात ब्लॉकेज; महिलेची पोलिसांत तक्रार

Pune News : पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे माझ्या हृदयात ब्लॉकेज; महिलेची पोलिसांत तक्रार

पतीच्या सततच्या टोमण्यांमुळे आपल्या हृदयात ब्लॉकेज निर्माण झालं, अशी तक्रार पुण्यातल्या एका महिलेने केली आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर आता तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातल्या धनकवडी इथं राहणाऱ्या महिलेने ही तक्रार दिली आहे.

या महिलेचं २०२१ मध्ये धनकवडी इथल्या प्रतीक यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र काही महिन्यांमध्ये पती आणि सासरची मंडळी आपल्याला वारंवार मानसिक त्रास देत असल्याचं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. दोन वर्षांपासून आपला सतत मानसिक छळ होत आहे. या त्रासामुळेच आपल्या हृदयात ब्लॉकेज आढळलं आहे, अशी तक्रार या महिलेने दिली आहे.

पुणे शहरातील धनकवडी येथे राहणाऱ्या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार जुलै २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी पती आणि सासरच्या इतर मंडळीच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :heart attackWoman