पुणे: चांदणी चौकाजवळ कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

बाबासाहेब तारे
गुरुवार, 25 मे 2017

सतीश मारुती वाजे (वय, 30 रा. पाचाणे-पुचाने, ता. मावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी दोन’च्या सुमारास सदरील मृतदेह करड्या रंगाच्या मारुती स्विफ्ट (एमएच 14 एफसी 1973) मध्ये वारजे डुक्कर खिंडीजवळील वंडर फ्युचुरा सोसायटी समोरील उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर, गाडी पार्क केलेल्या अवस्थेत आढळून आला.

पुणे - कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या वारजे टप्प्यात असलेल्या डुक्कर खिंडीजवळ एका स्विफ्ट मोटारीत 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून, रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतरच त्या तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश मारुती वाजे (वय, 30 रा. पाचाणे-पुचाने, ता. मावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी दोन’च्या सुमारास सदरील मृतदेह करड्या रंगाच्या मारुती स्विफ्ट (एमएच 14 एफसी 1973) मध्ये वारजे डुक्कर खिंडीजवळील वंडर फ्युचुरा सोसायटी समोरील उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर, गाडी पार्क केलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत महामार्ग गस्ती पथकाचे सुधीर पाटील यांनी वारजे पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर सदरील प्रकार उघडकीस आला. मात्र सदरील घटनास्थळ कोथरूड पोलिसांच्या हद्दीत असल्याने वारजे पोलिसांनी कोथरूड पोलिसांना कळवून, पुढील कार्यवाही त्यांच्या हाती सोपवली.

या घटनेतील मयत सतीश वाजे या ठिकाणी कधी, कसा आणि का आला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नसून, पोलिस तपास करत आहेत. मात्र एका वाटसरू महिलेने दिलेल्या माहितीनुसार सदरील मोटारचालक आज सकाळी साडेसात पावणेआठ वाजता या ठिकाणी डुलत डुलत गाडी चालवत होता. त्याला गाडी बाजूला लावायला सांगून साद्दरील महिला कामाला गेली होती. दुपारी ती परत येत असताना तिला पोलिस आणि लोकांची गर्दी दिसल्यानंतर सदरील महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

प्राथमिक दर्शनी सदरील व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे समजून येत नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल असे कोथरूड पोलिसांनी सांगितले. याबाबत कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रानेही फेटाळला​
शिरुर: विनयभंग प्रकरणी महाराजाला मंदिरातून अटक​
तेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार
समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

Web Title: Pune news body found in a car near Chandni Chowk