हिंदी चित्रपट चौकटीतून बाहेर पडतोय - शर्मिला टागोर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे - ""साठच्या दशकात अभिनेत्रींनी असे वागावे, तसे वागू नये, याचे जणू अलिखित नियमच होते. अशा काळात मी "ऍन इव्हिनिंग इन पॅरिस' या चित्रपटात बिकिनी घालून पडद्यावर आले. हा बदल सर्वांसाठी धक्कादायक होता. मला अनेक उलट-सुलट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. लोकांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. जास्त चित्रपट मिळविण्यासाठी हे केले, असेही बोलले गेले; पण आताच्या अभिनेत्रींनी बिकिनी घालणे किती सामान्य झाले आहे. इतकेच काय बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत हिंदी चित्रपटांचा "चेहरा'ही बदलत चालला आहे.

पुणे - ""साठच्या दशकात अभिनेत्रींनी असे वागावे, तसे वागू नये, याचे जणू अलिखित नियमच होते. अशा काळात मी "ऍन इव्हिनिंग इन पॅरिस' या चित्रपटात बिकिनी घालून पडद्यावर आले. हा बदल सर्वांसाठी धक्कादायक होता. मला अनेक उलट-सुलट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. लोकांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. जास्त चित्रपट मिळविण्यासाठी हे केले, असेही बोलले गेले; पण आताच्या अभिनेत्रींनी बिकिनी घालणे किती सामान्य झाले आहे. इतकेच काय बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत हिंदी चित्रपटांचा "चेहरा'ही बदलत चालला आहे. खरंतर चित्रपट चौकटीतून बाहेर पडतोय...'' अशा शब्दांत चित्रपटसृष्टीतील बदलांकडे लक्ष वेधून घेत होत्या ज्येष्ठ अभिनेती शर्मिला टागोर. 

पन्नासहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत योगदान दिलेल्या आणि आपल्या अभिनयाने अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या शर्मिला टागोर "सिंबायोसिस'च्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त प्रेक्षकांसमोर आल्या अन्‌ "ये चॉंद सा रोशन चेहरा' हे गाणे सुरू झाले. त्यानंतर "कोरा कागज था ये मन मेरा', "ये देख के दिल झुमा', "गुनगुना रहे हैं', "दिल ढुंढता है फिर वही' अशी वेगवेगळी गाणी सादर झाली. या वेळी पडद्यामागच्या आठवणी खुद्द त्या सांगू लागल्या आणि "यांदो की मैफल' रंगत गेली. 

टागोर म्हणाल्या, ""मी वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांत काम केले; पण लोकप्रिय चित्रपटांना नावे ठेवणे मला योग्य वाटत नाही. या चित्रपटांचे वेगळे योगदान आहे. ते आपल्याला नाकारता येणार नाही. या चित्रपटांना प्रेक्षक उचलून घेतात, याचा अर्थ या चित्रपटांत काहीतरी आहे ना! अवास्तव गोष्टी वास्तवाला धरून सांगण्याची ताकद लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटांमध्ये आहे. पूर्वीच्या काळी कलाकारांना ठराविक प्रतिमेमध्ये अडकवले जायचे. आता कलाकारांची चौफेर मुशाफिरी आणि आशयघन विषयांतून चित्रपटसृष्टी बहरत आहे. हे "बजरंगी भाईजान', "तुम्हारी सुल्लू' अशा कितीतरी चित्रपटातून दिसते.'' 

..अन्‌ उलगडला सुवर्णकाळ 
सत्यजित रे यांच्यापासून राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार अशा वेगवेगळ्या कलाकारांबाबतचे अनुभव सांगत त्यांनी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळच शब्दांतून उभा केला. अनुपम सिद्धार्थ यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

Web Title: pune news bollywood Sharmila Tagore