दप्तराचे ओझे निम्म्याहून कमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

काही शाळांचा प्रयत्न; शाळेतच पिण्याच्या पाण्याची सोय 

पुणे - वह्या, पुस्तके, खेळाचे साहित्य, वॉटर बॅगमुळे विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे सहन करावे लागते. साहजिकच लहान वयातच त्यांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यावर आता काही शाळांनी तोडगा काढला असून, दप्तराचे वजन आठ किलोऐवजी निम्मे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही शाळांनी आठ तासांच्या वेळापत्रकातील काही तास शारीरिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, स्पोकन इंग्लिशसाठी ठेवले आहेत. 

खेळ असो की खासगी शिकवणी असो, विद्यार्थी शाळेच्या दप्तरासोबतच शिकवणीच्या वह्या, खेळाचे साहित्य घेऊन येतात. परिणामी त्यांना आठ-दहा किलो वजन दररोजच पाठीवर घ्यावे लागते. याबाबत ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत पुण्यातील काही शाळांनी याबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. 

अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या मुख्याध्यापिका सुलभा शिंदे म्हणाल्या, ‘‘मुलींनी दप्तरात दोनशे पानी वह्यांऐवजी शंभर पानी वह्या ठेवाव्यात, अशी सूचना पालक आणि विद्यार्थिनींना केली आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍याही स्वच्छ करून घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना वॉटर बॅग भरून आणायची गरज नाही. आठवड्याच्या वेळापत्रकात दोन तास अन्य उपक्रमांस देणार आहोत. साहजिकच तीन ते चार किलोने दप्तराचे ओझे कमी होणार आहे.’’ 

न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी म्हणाल्या, ‘‘पुस्तकांचे एक सेट शाळेत ठेवण्यासाठी शाळा प्रशासनाने बावीस कपाटे खरेदी केली आहेत. शाळेतली पुस्तके शाळेत ठेवल्याने, घरीही विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुस्तकांचा एक सेट उपलब्ध होऊ शकतो.’’

पालकांनी विद्यार्थ्यांना जड वजनाची दप्तरे देऊ नयेत, असे आवाहन आम्ही केले आहे. शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके मिळतात. पालकांनी ही पुस्तके व्यवस्थित ठेवावीत. जेणेकरून पुढच्या इयत्तेच्या मुलांकरिता ही पुस्तके वापरात येऊ शकतात. त्यानुसार शिक्षकांनी पुस्तकांचे सेट केले आहेत. त्यामुळे दप्तराचे वजन कमी होण्यास मदत होईल.
- उज्ज्वला गायकवाड, मुख्याध्यापिका, भावे प्राथमिक शाळा 

Web Title: pune news book weight less