Pune Crime : धक्कादायक! भर रस्त्यात चुंबन घेतलं अन् म्हणाला लग्न कर नाही तर...तरुणावर गुन्हा दाखल l pune news boy kissed girl on road and threatened to kill if not she married shocking news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime : धक्कादायक! भर रस्त्यात चुंबन घेतलं अन् म्हणाला लग्न कर नाही तर...तरुणावर गुन्हा दाखल

पुण्यात घडला धक्कादायक प्रकार...

Pune News : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीला लग्नाची मागणी घालत तरुणीने भर रस्त्यात तिचे चुंबन घेतले. तसेच लग्न न केल्यास जीव देण्याची धमकी सुद्धा दिली. घाबरलेल्या तरुणीने तरुणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे प्रकरण?

शुभम गंगाधर शेडगे (वय २२, रा.नायगाव) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्यावर भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारीला घडला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा तरुणीच्या ओळखीचा आहे. दोघे मित्र आहेत. मात्र, तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. फिर्यादी तरुणी ही कात्रज बसस्टॉपजवळ उभी असतांना आरोपी तिच्या जवळ आला. त्याने तिच्याशी भर रस्त्यात जवळीक साधण्याच्या प्रयत्न केला. एवढेच नाही तर तिच्याशी लगट करून भररस्त्यात तिचे चुंबन आरोपीने घेत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. (Pune Crime)

हल्ली तरुणांमध्ये लव्ह अफेअर वन सायडेड लव्ह, अफेयर्स या सगळ्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत. मात्र हे प्रकरण फार धक्कादायक होतं. मित्र असूनही तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम जडले होते. आणि तरुणीने होकार दिला नाही तर तरुण त्याचा जीव द्यायला सुद्धा तयार होता.

घाबरलेल्या तरुणीने तक्रार करताच लगेच या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. हल्ली तरुणांमध्ये विकृत प्रवृत्ती वाढतच चालली आहे. पुण्यातसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसून येते. तरुणांना हवी ती गोष्ट न मिळाल्यास त्यांचा कल गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढत असल्याचे दिसून येते.