पावणेतीनशे पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे, - महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राज्यभरातील पुलांच्या ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’, देखभाल दुरुस्ती आणि नव्या पुलांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात स्वतंत्र पूल व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात आला आहे. पुणे विभागांतर्गत या विभागाकडे पाच जिल्ह्यांमधील २७७ ब्रिटिशकालीन, शिवकालीन आणि नव्या पुलांची जबाबदारी असणार आहे.

‘‘सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विभागात सामावून घेऊन हा स्वतंत्र विभाग काम करेल. अस्तित्वात असलेल्या सर्व पुलांच्या तपासण्या, देखरेख दुरुस्ती आणि नव्या पुलांचे प्रस्ताव, उभारणीचे काम या विभागाकडून केले जाईल. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरातील २७७ पुलांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. पाच जिल्ह्यांमधील प्रमुख राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरील छोटे, मोठे आणि मध्यम पुलांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. यामध्ये प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर १६६ पूल, राज्य महामार्गावर २५, तर जिल्हा मार्गांवर ८६ पूल आहेत. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. या विभागात काम करण्यासाठी स्वेच्छेने नावे कळविण्याबाबत आवाहन केले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हा विभाग कार्यरत होईल,’’ अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी दिले.

Web Title: pune news bridge Structural Audit