ब्राऊन शुगर विकणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पुणे - भवानी पेठ परिसरात ब्राऊन शुगर विकण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना खडक पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 60 हजार रुपये किमतीचे साडेबारा ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केले आहे. न्यायालयाने आरोपींना 23 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

अजहर ऊर्फ चुहा हयात शेख (वय 22, रा. हरकानगर, भवानी पेठ) आणि जोहेब ऊर्फ पप्पू सत्तार शेख (वय 23, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते दोघेजण भवानी पेठ परिसरात ब्राऊन शुगर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी इम्रान नदाफ यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी कागलवाला सोसायटी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ब्राऊन शुगर आढळून आले. ते कासेवाडी, लोहियानगर, भवानी पेठ आणि लष्कर परिसरातील तरुणांना ब्राऊन शुगर विकत असल्याचे त्यांनी सांगितले. 

अजहर शेख याच्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. तर, जोहेब शेख याच्यावर दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, सहायक निरीक्षक उमाजी राठोड, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह कर्मचारी विजू कांबळे, सर्फराज शेख, महेंद्र पवार, संदीप कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: pune news brown sugar crime