बस वाहकाला मारहाण प्रकरणी पोलिस कर्मचाऱयावर गुन्हा दाखल
पुणेः बस इच्छित स्थळी न थांबवल्याने वाद होऊन पोलिस कर्मचा-याने पीएमपीएल बस वाहकास मारहाण केल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱया विरूद्ध औंध पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणेः बस इच्छित स्थळी न थांबवल्याने वाद होऊन पोलिस कर्मचा-याने पीएमपीएल बस वाहकास मारहाण केल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱया विरूद्ध औंध पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. 5) रात्री एमएच 14, सीडब्लू 2163 या बसमध्ये जगताप डेअरी ते बॉडीगेट पोलिस कर्मचारी वसाहत येथे येण्यासाठी पोलिस कर्मचारी हनुमंत धुमाळ हे बसले होते. बॉडीगेट थांब्यावर बस न थांबल्याने धुमाळ यांनी बसची घंटा वाजवली. यावरून धुमाळ व बसवाहक दत्तात्रेय प्रल्हाद जायभाय यांच्यात वाद झाला. वाद वाढल्याने पोलिस कर्मचारी यांनी आपल्याला मारहाण करून शिवीगाळ केली. पोलिस कर्मचा-याने मारहाण केल्याने बसवाहक दत्तात्रेय जायभाय यांच्या तक्रारीवरून पोलिस कर्मचारी हनुमंत धुमाळ यांच्या विरोधात औंध पोलिस चौकित गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी धुमाळ हे हिंजवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असून ते औंध येथे बॉडीगेट पोलिस वसाहतीत राहतात.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'?
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले
नागरिक बनले पोलिस अधिकारी