पुणे: पगार न मिळाल्याने कोथरूड डेपोमध्ये बस चालकांचा संप

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

या गाड्या प्रामुख्याने वारजे माळवाडी ते वाघोली वज्र्य गाडीचा समावेश, कोथरूड ते विश्रांतवाडी, वारजे माळवाडी ते वाघोली, एनडीए गेट ते मनपा भवन, कोथरूड ते कात्रज, कोथरूड ते कोंढवा या मार्गावर धावणाऱ्या मार्गावरील बससेवा विस्कळीत झाली आहे. या मार्गावर अन्य मार्गावरील बस देऊन ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न कोथरूड डेपोतील अधीकाऱ्यांनी केला आहे. 

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड(पीएमपीएमएल) च्या कोथरूड आगारातील मधील 60-70 बस चालकांनी(ड्रायव्हर) पगार न दिल्याच्या कारणामुळे संप केला आहे. परिणामी वाघोली, मनपा भवन, वारजे माळवाडी, कोंढवा गेट, कात्रज, कोंढवा, अप्पर मार्गावरील रस्त्यावरील बस सेवा विस्कळीत झाल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशी बस थांब्यावर ताटकळत उभे आहेत.

याबाबत, कोथरूड डेपो मधून मिळालेली माहिती नुसार, पीएमपीएमएलच्या जेएनएनआरयुएम(JNNRUM) मधून मिळालेल्या गाड्या प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्सने चालवायला घेतल्या आहेत. त्यांच्या चालकांचे पगार अद्याप झालेले नाहीत. म्हणून आज सकाळी 60- 70 जणांनी संप केल्याची माहिती मिळाली आहे. 

या गाड्या प्रामुख्याने वारजे माळवाडी ते वाघोली वज्र्य गाडीचा समावेश, कोथरूड ते विश्रांतवाडी, वारजे माळवाडी ते वाघोली, एनडीए गेट ते मनपा भवन, कोथरूड ते कात्रज, कोथरूड ते कोंढवा या मार्गावर धावणाऱ्या मार्गावरील बससेवा विस्कळीत झाली आहे. या मार्गावर अन्य मार्गावरील बस देऊन ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न कोथरूड डेपोतील अधीकाऱ्यांनी केला आहे. 

वाहक बसून चालक न आल्याने कायम असलेले 30 व दिवसाच्या वेतनावरील 35 असे 65 वाहक(कंडक्टर) बसून आहेत त्यांना आज ड्युटी मिळालेली नाही.

Web Title: Pune news bus employee strike