व्यावसायिकाने बुडविला पावणेपाच कोटींचा कर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

पुणे - वस्तू व सेवाकर भरणे आवश्‍यक असतानाही केमिकल कंपनी चालविणाऱ्या व्यावसायिकाने आठ वर्षांपासून वस्तू व सेवाकर बुडविला. याबाबत वस्तू व सेवाकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित व्यावसायिकाविरुद्ध कर, व्याज व त्यावरील दंड अशी एकूण चार कोटी ७६ लाख रुपयांची सरकारची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली.

मेसर्स कॉन्टिनेंटल सेल्स ॲण्ड सर्व्हिसेसचे मालक राहुल रमेश टाटिया (रा. मुकुंदनगर) यांच्याविरुद्ध वस्तू व सेवाकर विभागाचे सहायक राज्यकर आयुक्त किरण जाधव यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिल लोहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदनगर येथील एका केमिकल कंपनीच्या मालकाकडून २००९-१० या आर्थिक वर्षापासून वस्तू व सेवाकर भरला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अधिक माहिती घेतल्यानंतर संबंधित व्यावसायिक कर भरण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आत्तापर्यंत बुडविलेला कर, त्यावरील व्याज व दंड असे एकूण चार कोटी ७६ लाख रुपयांची इतक्‍या रुपयांची सरकारची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली. त्यावरून पोलिसांनी टाटिया यांचा शोध घेण्यास सुरवात केली असल्याचे लोहार यांनी सांगितले.

Web Title: pune news businessman cheating crime