ज्येष्ठ उद्योगपती के. आर. नातू यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे - ज्येष्ठ उद्योगपती के. आर. नातू (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांनी डेक्कन मॅकेनिकल अँड केमिकल इंडस्ट्रीज म्हणजेच ‘डिमॅक’ या कंपनीची स्थापना करून तिला नावारूपाला आणली. नातू यांचा जन्म १९३२ मध्ये झाला. वयाच्या सदोतिसाव्या वर्षी त्यांनी डिमॅकची स्थापना केली. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या नात्याने त्यांनी शेवटपर्यंत कंपनीची धुरा सांभाळली. नातू हे तंत्रज्ञ म्हणून नावाजलेले होते.

आपल्या कल्पकतेने कंपनीचे रूपांतर उद्योगसमूहात करून तो त्यांनी यशस्वी करून दाखविला. देशातील उद्योग क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय होते. तरुण, होतकरू उद्योजकांना ते नेहमीच मार्गदर्शन करीत असत.

अभियांत्रिकी क्षेत्राला लागणारी उत्पादने आणि सेवा देण्याचे काम डिमॅकने केले. ऊर्जा, खाणकाम, सिमेंट, पोलाद अशा उद्योगांमधील मटेरिअल हॅंडलिंग उत्पादनांच्या निर्मितीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे या कंपनीची उलाढाल शंभर कोटी रुपयांवर पोचली. ‘डिमॅक’च्या कर्मचारीवर्गातर्फे नातू यांना आदरांजली वाहण्यात आली.

Web Title: pune news businessman k. r natu death