प्लॅस्टिकवरून व्यापारी-अधिकाऱ्यांत वाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे - प्लॅस्टिक बंदीचा निर्णय अमलात आणण्यासाठी महापालिकेने सोमवारपासून पावले उचलली; पण बंदीचा अध्यादेश आहे का? अशी विचारणा करीत प्लॅस्टिकची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कारवाईला जोरदार विरोध केला. त्यावरून महापालिकेचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला. दरम्यान मार्केट यार्ड, शुक्रवार पेठ आणि रविवार पेठेतील घाऊक व्यापाऱ्यांकडील प्लॅस्टिक महापालिकेने ताब्यात घेतले.

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच भागातील बाजारपेठांमध्ये पाहणी करून कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १५ पथके नेमली असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी शहरात सोमवारी सकाळपासून सुरू झाली. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बाजारपेठांमध्ये जाऊन पाहणी केली, तेव्हा तेथील बहुतांशी दुकानांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि थर्माकोलच्या वस्तू आढळून आल्या.

या वस्तू विकण्यास बंदी असल्याचे सांगून, त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला. बंदी जाहीर झाली असली तरी अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे माल देणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. तरीही काही व्यापाऱ्यांकडील वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. त्यावरून मार्केट यार्डातील व्यापारी आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविले. दरम्यान, राज्य सरकारचा अध्यादेश महापालिकेकडे न आल्याने पालिका प्रशासनाची अडचण झाली आहे.

कारवाईसाठी १५ पथके
एका पथकात 1 अधिकारी, 4 कर्मचारी

शहर आणि उपनगरांमध्ये प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येत असून, बाजारपेठांमधील उपलब्ध माल, विक्रीची पाहणी करण्यासाठी १५ पथके नेमली आहेत. प्रत्येक पथकात एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात व्यापाऱ्यांकडील प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. परंतु, बंदीबाबतचा अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर नव्याने कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- सुरेश जगताप, सहआयुक्त, महापालिका

Web Title: pune news businessman officer dispute on plastic