सीए परीक्षेत नमन ओसवाल पुणे जिल्ह्यात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पुणे - सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अंतिम परीक्षेत कर्नाल येथील मोहित गुप्ता हा 587 गुण मिळवत देशात पहिला आला आहे. पुणे जिल्ह्यात पुण्यातील नमन ओसवाल याने प्रथम, परेश भिडे द्वितीय आणि शुभम जैन याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

पुणे - सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अंतिम परीक्षेत कर्नाल येथील मोहित गुप्ता हा 587 गुण मिळवत देशात पहिला आला आहे. पुणे जिल्ह्यात पुण्यातील नमन ओसवाल याने प्रथम, परेश भिडे द्वितीय आणि शुभम जैन याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

सीएच्या ग्रुप एक आणि दोनसाठी 30 हजार 54 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 22.76 टक्के म्हणजेच सहा हजार 841 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रूप एकचा निकाल 15.91 टक्के असून, त्यात सहा हजार 257, तर ग्रुप दोनमध्ये 15.11 टक्के म्हणजे सहा हजार सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नऊ हजार 479 विद्यार्थ्यांना सनदी लेखापाल म्हणून पात्र ठरविण्यात आले आहे.

ओसवाल याला 800 पैकी 499, भिडे याला 478, जैन याला 469 तसेच पिंपरी चिंचवड येथील मंदार पुरंदरे याला 420, हृषीकेश अनेरे आणि अद्वैत वेलणकर यांना प्रत्येक 400 गुण मिळाले आहेत. देशात द्वितीय क्रमांक मिळविलेला दिल्लीतील प्रशांत याला 571, तर तृतीय क्रमांक मिळविलेला आदित्य मित्तल याला 565 गुण मिळाले आहेत.

परीक्षेतील यशाबद्दल नमन याने "सकाळ'शी बोलताना आंनद व्यक्त केला. तो म्हणाला, 'निकाल समजल्यानंतर खूप आनंद झाला. या परीक्षेत चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा ठेवली नव्हती; पण अभ्यास चांगला केला होता. त्यातही तासांचा हिशेब केला नाही, तर नियोजन चांगले करून अभ्यास केला. संकल्पना समजून घेऊन त्यावर भर दिला.''

परेश म्हणाला, 'अभ्यासासाठी वेळेचे महत्त्व असते. त्याचे व्यवस्थित नियोजन केले होते. वेगवेगळ्या चाचणी दिल्याने कमतरता समजल्या. त्यात सुधारणा केली. संकल्पना समजून घेण्यावरच माझा विशेष भर होता. साधारणपणे दहा ते बारा तास अभ्यास केला.''

Web Title: pune news ca exam result declare