शिरुर: विनयभंग प्रकरणी महाराजाला मंदिरातून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

शिरुर जवळ चव्हाणवाडी (ता. शिरुर) येथे लहान मुलांसाठी बाबाजी चाळक हे गेल्या अनेक वर्षांपासून आश्रम चालवत आहेत. येथील आश्रमातील मुलींशी अश्लिल चाळे केल्यानंतर या मुली घरी गेल्या.

शिरुर - शिरुरजवळ आश्रम चालवणाऱ्या एका किर्तनकारास रांजणगांव मंदिरात विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बाबाजी महाराज चाळक असे अटक केलेल्या महाराजांचे नाव आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर जवळ चव्हाणवाडी (ता. शिरुर) येथे लहान मुलांसाठी बाबाजी चाळक हे गेल्या अनेक वर्षांपासून आश्रम चालवत आहेत. येथील आश्रमातील मुलींशी अश्लिल चाळे केल्यानंतर या मुली घरी गेल्या. त्यानंतर त्या परत आल्याच नाहीत. पालकांनी विश्वासात घेतल्यानंतर मुलींनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलींनी शिरुर पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली.

पिडीत मुलींनी तक्रार दिल्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी चाळक महाराजांना रांजणगाव येथील मंदिरातून किर्तन झाल्यानंतर ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संबंधित महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.

चाळक महाराज हे किर्तनासाठी शिरुर तालुक्यात चांगलेच प्रसिद्ध असून रांजणगांव परिसरात अटक केल्यानंतर या भागात चर्चांना उधाण आले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
तेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

राज्यातील पाच स्थळांना मिळणार जैवविविधता वारसाचा दर्जा
मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार
समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

Web Title: Pune news In the case of molestation, Maharaj arrested from the temple in Shirur