मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर सीबीआयचा छापा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने दि मुस्लिम को-ऑप. बॅंकेच्या भवानी पेठेतील मुख्य कार्यालयात छापा गुरुवारी छापा टाकला. यात "सीबीआय'ने काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही संचालकांनी बॅंकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्यावर कोट्यवधींचा मनी लॉंडरिंगचा आरोप केला आहे. त्यामुळे सीबीआयने ही कारवाई केल्याचे समजते.

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर इनामदार यांनी मनी लॉंडरिंगद्वारे बॅंकेत गैरव्यवहार केल्याची तक्रार आसिफ खान यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत "सीबीआय'चे पथक गुरुवारी सकाळी बॅंकेच्या भवानी पेठेतील मुख्य कार्यालयात दाखल झाले. या पथकाने महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

तसेच, सहकार आयुक्तांनी या बॅंकेच्या लेखापरीक्षणाचे आदेश दिले आहेत. विशेष लेखापरीक्षक बी. एच. बोडखे यांच्याकडे लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बॅंकेचे संचालक एस. एम. इक्‍बाल आणि इम्तियाज लतीफ शिकीलकर यांनीही बॅंकेच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती.

"ठेवीदारांनी घाबरू नये'
पुणे - सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुस्लिम बॅंकेतून एक-दोन नोंदवह्यांच्या प्रती घेतल्या. यापूर्वीही सीबीआय अधिकारी बॅंकेत येऊन गेलेले आहेत. मात्र, त्यांनी कोणत्या कारणासाठी बॅंकेला भेट दिली हे सांगितलेले नाही. "बॅंकेच्याच दोन संचालकांनी तक्रार केल्याचा किंवा सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीच्या कर्ज प्रकरणाला विरोध केल्यामुळे त्यांचा राजकीय डावपेचाचा हा भाग असण्याची शक्‍यता आहे,' असे बॅंकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

"दबावतंत्राचा वापर करून कर्ज किंवा अन्य फायदे मिळतात का, हे देखील कारण असू शकते. नोटाबंदीच्या काळात अनेक सहकारी बॅंकांच्या नोंदी तपासल्या जात आहेत, त्याचाही हा भाग असू शकतो. बॅंकेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक यांनी घाबरून जाऊ नये,' असे डॉ. इनामदार यांनी नमूद केले आहे.

Web Title: pune news cbi raid on muslim co operative bank