चांदणी चौक उड्डाण पुलाचे उद्या भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे - शहराचे पश्‍चिम प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणि अपघातांची मालिका थांबविण्यासाठी या चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाण पुलाचे डिजिटल भूमिपूजन येत्या रविवारी (ता. 27) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. या वेळी खेड-सिन्नर महामार्गावरील बाह्यवळण मार्गाच्या कामाचा प्रारंभ आणि पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण होणार आहे. 

चांदणी चौकातून मुंबई, मुळशी, सातारा, कोथरूड आणि एनडीए रस्त्याकडे जाता येईल, अशी या पुलाची रचना करण्यात आली आहे. या पुलासोबत पाषाण-बावधन ते कोथरूड मार्गासाठी दोन सब-वे तयार करण्यात येणार आहेत. या कामासाठी गडकरी यांनी सुमारे 419 कोटी रुपये मंजूर केले असून, दोन-तीन वर्षांत काम पूर्ण होईल, अशी माहिती पुलासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली. पुलाच्या कामासाठी सुमारे 27 हेक्‍टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. त्यातील सुमारे 12 हेक्‍टर जागेचे भूसंपादन महापालिका करणार असून, सव्वा हेक्‍टर जागा खासगी आहे. उर्वरित जागा शासकीय संस्थांची आहे. या प्रकल्पामुळे 116 कुटुंबे बाधित होणार असून, त्यांचे पुनर्वसनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बावधनमधील मराठा मंदिरमध्ये रविवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल. या पुलासाठी "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. 

नेमका प्रकल्प काय आहे? 

कात्रज-देहूरोड बाह्यवळण राष्ट्रीय महामार्गावर पूल 
पुलाची रुंदी 60 मीटर 
अस्तित्वातील रस्त्यांचे मंजूर डीपी नकाशानुसार रुंदीकरण होणार 
पाषाण-बावधन ते कोथरूडसाठी सब-वे 
मुंबई महामार्गासाठी स्वतंत्र दोन लेनचे रस्ते 
चांदणी चौकातील तीव्र चढ आणि तीव्र उतार तीन पटीने कमी करणार 
चौकातील वाहतूक यंत्रणा सिग्नलविरहित करणार 

Web Title: pune news chandni chowk