शिवण्यात मुठेकाठी रंगला छट पूजेचा सोहळा

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

छट पूजेसाठी शिवणे येथील भाजपच्या गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता व सरचिटणीस सचिन दांगट यांनी मुठा घाट सुशोभित केला होता. तेथे देवीच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

शिवणे  :  उत्तर भारतीय महिलांचा नदी किनारी पाच ऊस उभे करून त्याखाली कट्टा शेणाने गोल सारवून छटमाते प्रतिष्ठापना करून तेथे दिवा लावून तिला फळांचा नैवद्य दाखवीला. महिलांनी पाण्यात उभे राहून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नैवद्य दाखविताना. पाण्यालागत दिवे लावल्याने नदीत दीपोउत्सव साजरा झाला. छटमातेच्या पूजेचा सोहळा मुठा नदी किनारी रंगला आहे.

शिवणे येथील भाजपच्या गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता व सरचिटणीस सचिन दांगट यांनी मुठा घाट सुशोभित केला होता. तेथे देवीच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी, आमदार भीमराव तापकीर आणि त्याचे सहकारी यांनी उपस्थित राहून या नागरिकांना शुभेच्छा दिल्या तसेच पुढील वर्षी पासून छट पूजेच्या कार्यकर्माला महापालिकेच्या माध्यमातून सेवा सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले. उमेश सरपाटील, बाळासाहेब नवले, संतोष देशमुख,प्रकाश साळवे, सुनीता मेंगडे, सुनंदा शिंदे, मंगेश पवार, दीपक दांगट, घुले, अभिजित धावडे, श्रीनाथ साळुंखे, सोमनाथ दांगट, यावेळी उपस्थित होते. शिवणे छट मंडळाचे अध्यक्ष रामसिंग गौतम, रामनवमी सहानी,  धर्मेंद्र सिंग, रामधन यादव, सुरेंद्र यादव यांनी याठिकाणी नियोजन केले होते. मुठा नदीत धार्मिक प्रसन्न वातावरण झाले होते. 

ही पूजा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पूजा झाली. उद्या शुक्रवारी पुन्हा त्याच ठिकाणी पहाटे चार वाजता येऊन दिवा लावून सूर्योदयाची वाट पाहिली जाते. सकाळी सूर्याला नैवद्य दाखवून उपवास सोडला जातो. असे मीरा सहानी, मीरा यादव यांनी सांगितले.  त्यामुळे, सचिन दांगट यांनी वीज व्यवस्था, स्पिकर, स्वच्छता, रेड कार्पेट, नदीत येण्यासाठी रस्ता केला होता.  पूर्वी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूजा केली जात होती. परंतू तेथे आता जाळी लावल्यामुळे दोन वर्षापासून शिवणे दांगट पाटील नगर येथील वाळवंटात पूजेचा सोहळा रंगला होता, असे छट पूजा मंडळाच्या कार्यक्रर्यांनी सांगितले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news chhat puja on mutha river bank