गेम्स असलेल्या कंपासना मुलांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

पुणे - बार्बी, बॅटमन, बेनटेन, छोटा भीम अशी कार्टूनची चित्रे असलेल्या बहुरंगी वॉटर बॅग, कंपास बॉक्‍स, पेन्सिल, वह्या, टिफिन आदी शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ सजली आहे. शाळेत जाताना विद्यार्थ्यांना नवीन शालेय साहित्य हवे असते, त्यामुळे पालकांसह चिमुकल्यांनी बाजारात शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी केली आहे. 

शहरातील बाजारपेठत शंभर पानी वह्यांच्या किमती एक डझन पन्नास रुपयांपासून ते एकशे ऐंशी रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. टिफिन व कंपास बॉक्‍स वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेम्स असलेल्या कंपास बॉक्‍सला मुलांची अधिक पसंती मिळत आहे. यंदा बाजारात प्रथमच आलेले लाइटचे कंपास मुलांचे आकर्षण ठरत आहेत. कंपासच्या किमती पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत आहेत. कार्टूनचे चित्र असलेल्या वॉटर बॅग व एअरटाइट लंच बॉक्‍सची अधिक विक्री होत आहे. विविध कंपन्यांसह स्थानिक कंपन्यांच्या वह्या, त्यातही छोट्या वह्यांपेक्षा फुलस्केप वह्यांना अधिक मागणी आहे. 

शाळा सुरू होण्यापूर्वी पालक शालेय साहित्य खरेदीसाठी येतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या काही महिन्यांआधी शालेय साहित्य विक्रीस ठेवण्यात येते. लहान मुलांची आवड लक्षात घेऊन शालेय साहित्य तयार केले जाते. यंदा शाळेच्या दप्तरासह पेन, पेन्सिल, वॉटर बॅग, पट्टी, कंपास बहुरंगांत तयार केले आहेत. त्याला मागणी जास्त आहे. बालवाडीतील चिमुकल्यांसाठी तर खास कार्टूनच्या आकारातील कंपास, डबा, पेन्सिल असे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे विक्रेते दत्तात्रेय मदने यांनी सांगितले.

Web Title: pune news child demand to games campas