अल्पवयीन मुलीला झोपेतून उचलून नेऊन बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

शिरूर (पुणे): जांबूत येथील शिस्तार वस्तीवर अल्पवयीन मुलीला (वय 10) मध्यरात्री झोपेतून उचलून नेऊन शेतामध्ये बलात्कार करण्याची घटना घडली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगी, तिचे वडील व लहान भाऊ हे रात्री मंगळवारी (ता. 23) घरासमोर टाकलेल्या पलंगावर झोपले होते. आई घरात झोपली होती. रात्री अकरा वाजता वीज आल्याने वडील जवळच असणाऱ्या शेतावर मोटार चालू करून पाणी भरण्यास निघून गेले. मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पीडीत मुलीला उचलून नेले. मी तुझा पप्पा आहे, आपल्याला पाणी भरायला जायचे. असे सांगून तिला जवळच असणाऱ्या शेतात नेले. तेथे विवस्त्र करून तिच्यावर बलात्कार केला. त्याला प्रतिकार केल्यावर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या नंतर अंगाभोवती गोधडी गुंडाळून तिला पुन्हा घराजवळ आणून सोडले.

या बाबत सर्व घटना मुलीने आईला सांगितल्यावर तिने सकाळी शेतावरून आलेल्या पतीला सांगून शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. शिरूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश क्षिरसागर व पोलीस उपनिरीक्षक युसूफ इनामदार करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परीसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीसरात बिबट्याचा वावर वाढल्याने घबराहट असताना या घटनेने घबराहटीचे वातावरण वाढले आहे. तत्काळ या घटनेचा तपास करण्यात यावा अशी मागणी या परीसरातील नागरीक करू लागले आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः

Web Title: pune news child rape case in shirur taluka