चिन्मय नादबिंदू महोत्सव आजपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे - ख्यातनाम नृत्य कलाकार मालविका सरुक्काई आणि शंकर कंडास्वामी यांचे भरतनाट्यम, श्रीरामप्रसाद आणि रविकुमार मल्लाडी बंधू यांचे कर्नाटक शैलीतील गायन, विजय घाटे यांचे एकल तबला वादन, ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका मंजूषा पाटील यांचे सादरीकरण, डॉ. ललिता आणि नंदिनी यांचे कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन... ही प्रयोगकलांचा अनोखा संगम साधणाऱ्या यंदाच्या आठव्या चिन्मय नादबिंदू महोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत.

तीन दिवसांचा हा निवासी महोत्सव शुक्रवार (ता. ९) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ’ या महोत्सवासाठी माध्यम प्रायोजक आहे. 

या कलाकारांच्या मैफलींसह विजय घाटे यांचे ‘रायडिंग ऑन ऱ्हिदम’ आणि चिन्मय विश्‍वविद्यापीठाच्या व्हीजन डायरेक्‍टर रमा भारद्वाज यांचा नृत्यविषयक ‘अंगहारा’ असे दोन कला-चर्चा-प्रात्यक्षिकाचे कार्यक्रमही होणार आहेत. तसेच वेदांताचे गाढे अभ्यासक, कवी स्वामी तेजोमयानंद यांचे प्रवचन हे आणखी एक वैशिष्ट्य असेल.

मुळशी तालुक्‍यातील कोळवण येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या चिन्मय विभूती आश्रम परिसरात हा विविधरंगी कलामहोत्सव चालेल. चिन्मय विभूती परिसरात प्रयोगकलांमधील दिग्गजांच्या सान्निध्यामध्ये दोन दिवस आणि तीन रात्र कलास्वाद घेण्याची पर्वणी चिन्मय नादबिंदू महोत्सवाद्वारे रसिकांना साधता येते. गेली सात वर्षे होत असलेल्या या महोत्सवात शास्त्रीय संगीत आणि नृत्यकलांमधील जुन्या जाणत्या दिग्गजांपासून ते समकालीन आणि उभरत्या आश्वासक युवा कलाकारांपर्यंत अनेक कलाकार आपली कला सादर करतात.

चिन्मय नादबिंदू महोत्सवाचे यंदाचे सहावे पर्वही असा भरगच्च कार्यक्रम घेऊन आले आहे. महोत्सवाची सुरवात भरतनाट्यम नृत्यांगना अनिता गुहा आणि चेन्नईतील त्यांच्या ११ कलाकारांच्या ‘भरतांजली’ या संचाच्या ‘सुंदर कांडम’ या सादरीकरणाने होणार आहे. गायक बंधू पंडित राजन आणि साजन मिश्रा आणि सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रकारातील, तर प्रिया भगिनींचे कर्नाटकी शास्त्रीय संगीत प्रकारातील कलाविष्कार हे या महोत्सवाचे आणखी एक आकर्षण. अमेरिकेतील भरतनाट्यम नृत्यांगना मैथिली प्रकाश यांचा ‘शरणागती’ या नृत्य कार्यक्रमामुळे महोत्सवाला एक आंतरराष्ट्रीय आयाम मिळणार आहे.

व्हायोलिनवादक रामनाथ आणि त्यांच्यासोबत अभिजित बॅनर्जी, सोमनाथ रॉय, गौतम शोम यांचा ‘यशिला बॅंड’ हिंदुस्थानी संगीत प्रकाराचे नव्हे, तर लॅटिन अमेरिकी, युरोपीय आणि पश्‍चिम आशियाई सुरावटींचे फ्युजन करणारे संगीत या महोत्सवामध्ये सादर होणार आहे.

आठवा महोत्सव
कधी - शुक्रवार (ता. ९) ते रविवार (ता. ११)
कोठे - सुधर्मा सभागृह, चिन्मय विभूती, कोळवण, ता. मुळशी

Web Title: pune news Chinmay-nadbindu-Mahotsav