संकेतस्थळांवर विविध भेटवस्तूंची रेलचेल

संकेतस्थळांवर विविध भेटवस्तूंची रेलचेल

पुणे - म्युझिकल सांता, गोल्ड ख्रिसमस ट्री, कलरफुल ग्रीटिंग कार्ड आणि ख्रिसमस चॉकलेट बॉक्‍स अशा विविध भेटवस्तूंनी ऑनलाइन संकेतस्थळे सध्या सजली आहेत. ख्रिसमससाठी सांताक्‍लॉजच्या कपड्यांपासून ते टोपीपर्यंत, कीचेनपासून ते वॉल हॅंगिगपर्यंतच्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. ख्रिसमस गिफ्ट हॅंपरच्या जोडीला खास लाल रंगाच्या थीममधील चॉकलेट बॉक्‍सही उपलब्ध आहेत. यावर विविध सवलतीही देण्यात आल्या आहेत. 

ख्रिसमससाठी भेटवस्तूंचे सर्वाधिक महत्त्व असते. ख्रिश्‍चन बांधव एकमेकांना गिफ्ट देऊन या सण साजरा करतात. त्यामुळे दरवर्षी नावीन्यपूर्ण आणि कल्पक अशा भेटवस्तूंची भर पडते. यंदाही यामध्ये वैविध्यता दिसून येते. फोटोफ्रेम्सपासून ते गिफ्ट हॅंपरपर्यंतच्या अनेक वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ख्रिसमससाठी लाल रंगाच्या थीमनुसार गिफ्ट हॅंपर तयार केले आहेत; तसेच वेगवेगळी फुले, चॉकलेट्‌स, की-चेन्स आणि ग्रीटिंग कार्ड असलेले अनोखे गिफ्ट हॅंपरही आपल्याला पाहायला मिळेल.

लहानग्यांना गिफ्ट देता यावे म्हणून चॉकलेट्‌स, केक, खेळणी, कलरबुक अशा विविध वस्तू पाहता येतील; तर ख्रिसमससाठी खास कलरफुल आकाशदिवे, एलईडी बलून्स, सांताक्‍लॉज टॉय विथ लाइट, चॉकलेट विथ रोझ बॉक्‍स, मोबाईल स्टॅंड, कलरफुल लॅंप, की-चेन्स, फोटो-फ्रेम्स, वॉल हॅंगिंग आणि इलेक्‍ट्रॉनिक गिफ्ट्‌स खरेदीसाठी आहे. १८ फ्लेवर्स असलेल्या चॉकलेट्‌सचा बॉक्‍ससह गिटार वाजविणारा सांताक्‍लॉज लोकांच्या नक्की पसंतीस उतरेल. हॅंडमेड पर्स, घड्याळ, मेकअप किट, नेकलेस, टी-शर्टस अशा विविध वस्तू गिफ्ट देण्यासाठी ऑर्डर करता येतील. त्याशिवाय कॅंडल्स, ख्रिसमस ट्री आणि सांताक्‍लॉजचे कपडे अशा विविध वस्तूही भेट देता येणार आहेत. ख्रिमसम बॅंण्ड्‌स, विविध संदेश असलेले कॉफी मग, लायटिंग ट्री, सांताक्‍लॉज बॅग, कुशन्स, चॉकलेट हॅंपर, कार्ड होल्डर्स, वॉल पेंटिग आणि अँटिक ज्वेलरीही आपल्याला बाजारात पाहायला मिळतील. 

‘गुडी बॅग’ही ऑनलाइन 
सांताक्‍लॉजची गुडी बॅग... गिफ्टने भरलेली... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी अन्‌ ख्रिसमसच्या निमित्ताला खास बनविणारी... हीच वेगवेगळ्या गिफ्टने भरलेली ‘गुडी बॅग’ आता ऑर्डर केली जात आहे. चॉकलेट्‌स, कॅंडीज, टॉईज, किचेन्स आणि ग्रीटिंग कार्ड अशा वैविध्यपूर्ण भेटवस्तूंनी भरलेली सांताक्‍लॉजची ही ‘गुडी बॅग’ ख्रिसमसला भेट देता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com