सांतासोबत नाताळ सेलिब्रेशन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

सेंट्रल मॉल हा ग्राहकांना नेहमीच नावीन्यपूर्ण गोष्टी देणारा मॉल म्हणून ओळखला जातो. आमच्या ग्राहकांना तसेच इतर नागरिकांना आनंद मिळावा, यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवीत असतो. लहान मुलांमधील कलेला व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून आयोजित उपक्रमाला नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो, ही आनंददायी बाब आहे.
- माधवराव लोलकपुरी (एसजीएम), पुणे सेंट्रल मॉल

पुणे - फॅन्सी ड्रेस, नृत्य आणि गुणदर्शन अशा स्पर्धांमधून झळकणारे एकाहून एक सरस बालकलाकार... स्पर्धेच्या शेवटी सांताक्‍लॉजची झोकात झालेली ‘एंट्री’... केक कापत केलेले नाताळचे सेलिब्रेशन आणि विजेत्या स्पर्धकांना सांताकडून मिळालेली बक्षिसे... अशा उत्साही वातावरणात ‘किड्‌स आयडॉल २०१७’चा सोहळा पार पडला. आर्या कोकाटे ही यंदाची ‘किड्‌स आयडॉल’ ठरली, तर नैतिक नगरकर आणि आर्या शिंदे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.

‘सकाळ माध्यम समूह’ आणि सेंट्रल मॉल, विद्यापीठ रस्ता यांच्या वतीने ही स्पर्धा म्हणजे बालचमूंसाठी आनंदाची पर्वणीच ठरली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. या स्पर्धेसाठी नृत्य दिग्दर्शक मृदांग देसाई आणि श्‍वेता फर्नांडिस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.  विद्यापीठ रस्ता येथील सेंट्रल मॉलच्या प्रांगणात रंगलेल्या या स्पर्धेत शहरातील अनेक बालकलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरवात फॅन्सी ड्रेस स्पर्धेने झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस, वासुदेव, पृथ्वी, प्लॅस्टिक अशा विविध रूपातील वेशभूषा केलेल्या बालकलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर झालेल्या नृत्य स्पर्धेत सादर होणाऱ्या एकाहून एक सरस कलाकृतींना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

सांताच्या आगमनाने कार्यक्रमात आणखी रंगत भरली. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत बालचमूंनी सांतासोबत केक कापला. गाणी, नृत्य अशा जल्लोषपूर्ण वातावरणात बालचमूंनी नाताळ साजरा केला. दरम्यान, विविध स्पर्धेत इंटरनॅशनल सेंटर ऑफ इक्विटी या ‘एनजीओ’मधील मुलांनीही सहभाग नोंदविला होता. या वेळी श्रुती वेलेकर हिला ‘प्रोत्साहन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे... 
फॅन्सी ड्रेस स्पर्धा 

अ गट - याशिता शेळके (प्रथम), आरव ओसवाल (द्वितीय) व आरोही रोकडे (तृतीय).
ब गट - सुहानी माहेश्‍वरी (प्रथम), वेदांती कौटकर (द्वितीय) व अक्षरा शहा (तृतीय).

मॉडेल हंट स्पर्धा -
अ गट - अनुष्का पवार (विजेती), अथर्व मांढरे (उपविजेता)
ब गट - श्रेया काळोखे (विजेता), क्षितिजा खरात (उपविजेती)

नृत्य स्पर्धा -
अ गट - नैतिक नगरकर (विजेता). अर्पिता येवले (प्रथम), मृण्मयी शिंदे (द्वितीय) व अनन्या बोर्डे (तृतीय).
ब गट - आर्या कोकाटे (विजेती). सोहम नवले (प्रथम), आर्या कांबळे (द्वितीय) व सोहम शेटे (तृतीय).
क गट - निर्मिती धर्माधिकारी (विजेती). हिरल हेडा (प्रथम), आदित्य गोरे (द्वितीय) व चेतन हडके (तृतीय).

Web Title: pune news christmas celebration with santa claus