श्रीफळाला भाव

श्रीफळाला भाव

पुणे - लाडक्‍या गणरायाच्या चरणी नारळ अर्पण करण्यासाठी आणि गणरायाला आवडणारा मोदक बनवण्यासाठी गणेशभक्तांकडून नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भाविकांकडून वाढती मागणी आणि कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतील नारळांचे उत्पादन घटल्याने वाढलेले भाव, यामुळे शहरातील गणेशोत्सवातील आतापर्यंतची नारळांची उलाढाल १५ कोटींच्या घरात पोचली आहे.

गणेशोत्सवात ठिकठिकाणचे गणेशभक्त पुण्यात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येतात. कोणी एक नारळ तर कोणी नारळाचे अख्खे तोरणच गणरायाच्या चरणी अर्पण करते. त्यामुळे शहरातील बहुतांश मंडळांत सध्या नारळांचे ‘डोंगर’ पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, गणरायाचे आवडते खाद्य म्हणजे मोदक घरोघरी बनवले जाते. त्यासाठीसुद्धा खोबऱ्याचा वापर केला जातो. यामुळे एकूणच नारळाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

नारळाचे व्यापारी दीपक बोरा म्हणाले, ‘‘तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागांतून नारळाची आवक होते. तेथे गेली तीन-चार वर्षे पुरेसा पाऊस झाला नाही. याचा परिणाम नारळाच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन कमी झाल्याने नारळाचे भाव मागील वर्षाच्या तुलनेने दुप्पट झाले आहेत. तरीसुद्धा पुण्यात नारळाची चांगली आवक सुरू आहे.’’ नवा नारळ हा पूजेसाठी किंवा तोरणासाठी वापरला जातो, तर इतर प्रकारचे नारळ हे मोदक व इतर खाद्यपदार्थांसाठी घरात आणि हॉटेलांमध्ये वापरले जातात. किरकोळ बाजारात एक नारळ पंधरा ते पंचवीस रुपयांना मिळत आहे, असेही ते म्हणाले.

गणेशभक्तांकडून वाढती मागणी

बहुतांश मंडळांत नारळांचे ‘डोंगर’

पंधरा कोटींच्या घरात उलाढाल

दोन वर्षांमधील भावातील फरक
नारळ    मागील वर्षीचे भाव    यंदाचे भाव (शेकड्यात)

नवा नारळ  :    ६०० ते ७००    ११५० ते १३५०
मद्रास       :    १५००    २५००
पालकोल (आंध्र) :    ९००    १३००-१४००
साफसोल (कर्नाटक) :    १०००    १८००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com