विकासासाठी सामूहिक प्रयत्न हवेत - बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे - पुणे शहराच्या विकासासाठी योजना आखल्या आहेत. त्यांची वेळेत अंमलबजावणी व्हावी, यासाठी पुरेसा निधीची गरज आहे. अशा योजना राबविण्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला सारून सामूहिक प्रयत्न हवेत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी सांगितले. योजनांसाठी अंमलबजावणीसाठी निश्‍चित धोरण आणि गतिमानताही ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत बापट बोलत होते. शहर, पिपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील आमदारांचे प्रश्‍न जाणून घेतल्यानंतर त्यात लक्ष घालण्याचे आश्‍वासन बापट यांनी दिले. 
बापट म्हणाले, ‘‘प्रत्येक मतदारसंघातील प्रश्‍न सुटल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ते सोडविण्याकरिता, योग्य नियोजन करण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी प्रत्येक आमदाराची आहे. नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज आहे. धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी केलीच पाहिजे. त्याकरिता एकवाक्‍यता असली पाहिजे.

विविध योजनांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळेल. मात्र, विकासकामांसाठी निधीची उपलब्ध करण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. अशा कामात सरकारी यंत्रणा आड येत असेल तर, त्याबाबत बोलले पाहिजे. या यंत्रणेतील कोणाही अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही. कामे करीत नाहीत, त्यांना धडा शिकवला पाहिजे.’’

Web Title: pune news Collective efforts are needed for development